अमळनेर ते शेगांव पायी वारीचे प्रस्थान; शिस्तबद्ध नियोजन

अमळनेर : अमळनेर ते शेगांव पायी वारी काल शनिवार, दिनांक २९ ऑक्टोबर २०२२ रोजी शेगांवला शिस्तबद्ध पद्धतीने रवाना झाली. दादासाहेब जी.एम सोनार नगर, अमळनेर येथील गजानन महाराज मंदिर येथून सकाळी पायी वारीची सुरुवात झाली. तत्पूर्वी सकाळी पाच वाजता मंदिरात गजानन महाराज यांचे पाद्यपूजन व महाआरती करण्यात आली. यावेळी वारीप्रमुख आर.बी.पवार सर, सौ.ज्योती पवार, नितीन भावे, अशोक भावे, रघूनाथ पाटील आदी उपस्थित होते.

दि.२९ ऑक्टोबरला निघालेली पायी वारी ३ नोव्हेंबरला शेगांवला पोहोचणार आहे. पायी वारीतील गजानन भक्तांना सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचा मुक्काम व जेवण याची सर्व व्यवस्था गजानन भक्त, सामाजिक कार्यकर्ते व संस्थांचे पदाधिकारी यांनी केली आहे. अमळनेर येथील दादासाहेब जी.एम.सोनार नगर येथून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पायीवारी निघाली. सर्व गजानन भक्त नाचत गाजत दिंडीत सहभागी झाल्याने वातावरण गजाननमय झाले होते. रस्त्यात अनेक कॉलनीमध्ये महिला मंडळांनी सडा रांगोळी काढून पायी दिंडीचे स्वागत केले. गजानन महाराज यांचे शेगांव पायी वारीला अनेक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, भाविक यांनी भेट देत गजानन महाराजांचा आशीर्वाद घेतला. या पायी वारीचे दहावे वर्ष आहे. अनेक भाविक, वृद्ध यात स्वखुशीने सहभागी झाले. यावेळी अमळनेर तालुक्यातील मारवड, पातोंडा, खापरखेडा, करणखेडा, भिलाली, कोळप्रिंपी, पिंगळवाडे, मुसळी, अमळगांव, तामसवाडी, सात्री, डांगरीसह ग्रामीण भागातील अनेक गजानन भक्त पायी दिंडीत सहभागी झाले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!