सुदाम महाजन, मधुकर पाटील, उमेश काटे यांचा समावेश ; मंगळवारी होणार पुरस्कार वितरण
अमळनेर : येथील प्रतापीयन्स माजी विद्यार्थी- माजी शिक्षक संघटना तर्फे नुकताच तीन जणांना ‘प्रतापियन्स प्रेरणा पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. यात निवृत्त अप्पर तहसीलदार तथा साहित्यीक सुदाम महाजन, जी.एस.टी.चे राज्य कर उपायुक्त मधुकर पाटील (जळगाव) व येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूलचे उपक्रमशील शिक्षक तथा दै.सकाळ चे पत्रकार उमेश प्रतापराव काटे यांचा समावेश आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून पुरस्कार जाहीर करण्यात आला नव्हता. मात्र यावर्षी कोरोनामुळे निर्बंध नसल्यामुळे या पुरस्काराचे वितरण मंगळवारी (ता.८) सकाळी अकराला येथील जी.एस.हायस्कूल च्या आयएमए हॉल मध्ये होणार आहे. दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. या पार्श्वभूमीवर २०२० या वर्षीचा पुरस्कार उपक्रमशील शिक्षक उमेश काटे यांना, २०२१ या वर्षीचा पुरस्कार जी.एस.टी.चे राज्य कर उपायुक्त मधुकर पाटील यांना तर २०२२ या वर्षीचा पुरस्कार निवृत्त अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रताप महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा.डॉ. एस ओ माळी यांनी दिली आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे पुरस्कारार्थींचे अभिनंदन !
‘करियर च्या विविध वाटा’ यावर मंगळवारी व्याख्यान
स्व.निळकंठ ओंकार माळी यांच्या ११ व्या स्मरणार्थ व्याख्यान व तालुकास्तरीय भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. यावेळी निवृत्त अप्पर तहसीलदार तथा साहित्यीक सुदाम महाजन, जी.एस.टी.चे राज्य कर उपायुक्त मधुकर पाटील यांचे ‘करियर च्या विविध वाटा’ या विषयावर मंगळवारी (ता.८) सकाळी अकराला येथील जी.एस.हायस्कूल च्या आयएमए हॉल मध्ये व्याख्यान होणार आहे. तरी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन प्रा.डॉ. एस.ओ. माळी आणि प्रतापीयन्स परिवारातर्फे करण्यात आले आहे.