अमळनेर : सालाबादाप्रमाणे वै.प.पू. ह.भ.प. विठ्ठल बाबा (मोठेबाबा) यांच्या कृपा-आशिर्वादाने तालुक्यातील शिवक्षेत्र खवशी येथील विठ्ठल मंदिराचे प्रांगणात ह.भ.प. भालचंद्र महाराज व ह.भ.प. गणेश महाराज, माऊली भजनी मंडळ यांचे मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे हे ७१ वे वर्ष सुरु आहे. ता.७ डिसेंबर ते १४ डिसेंबर २०२२ या काळात दररोज कार्यक्रम सुरु आहेत. सप्ताहभर दररोज सकाळी ५ ते ६ काकड आरती, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ तेे ११ हरि किर्तन याप्रमाणे कार्यक्रम सुरु राहतील.
बुधवार ता.७ रोजी ह.भ.प. चंद्रकांत महाराज- अर्थे, गुरुवार ता.८ रोजी ह.भ.प. तेजस महाराज- वडगाव, शुक्रवार ता.९ रोजी ह.भ.प. माधवराव महाराज- धानोरा, शनिवार ता.१० रोजी ह.भ.प. देवगोपाल शास्त्री महाराज- आडगाव, रविवार, ता.११ रोजी ह.भ.प. मच्छिंद्र महाराज- वाडीभोकर, सोमवार ता.१२ रोजी ह.भ.प. परमेश्वर महाराज- सुराये, मंगळवार ता.१३ रोजी ह.भ.प. योगेश महाराज- वाघाडी यांचे किर्तनाचा कार्यक्रम होईल. बुधवार ता.१४ रोजी ह.भ.प. जगन्नाथ महाराज- आर्वी यांचे सकाळी ९ ते ११ या वेळात काल्याचे किर्तनाने कार्यक्रमाची सांगता होईल. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडेल. कै.मनोहर शिवदास मराठे यांचे स्मरणार्थ श्री राकेश मराठे यांचा परिवार आठ दिवस किर्तनकार सेवा घेणारे मानकरी तर श्री भालचंद्र भिमराव पाटील यांचा परिवार महाप्रसादाचे मानकरी आहेत. खवशी येथील माऊली भजनी मंडळास श्री आनंदा देवराम कापडे हार्मोनियम भेट दिला आहे. ग्रामस्थांनी देखील विठ्ठल मंदिराच्या विकासासाठी रोख स्वरुपात सढळ हाताने मदत दिली आहे. पंचक्रोशीतील नांद्री, पातोंडा, अमळगाव, खेडी, जळोद, पिंपळी, गांधली, पिळोदा, रोटवद, दापोरी आदी ठिकाणचे भाविक व भजनी मंडळाचेही सहकार्य लाभणार आहे. समस्त नागरिक, भाविक, सेवेकरी यांनी मोठ्या संख्येने किर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन विठ्ठल रुख्मिणी मंदिर संस्थान, शिवशक्ती देवस्थान व ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.