‘माहिती अधिकार अधिनियम, २००५ संदर्भातील प्रसार माध्यमांच्या भूमिकेचे अन्वेषणात्मक अध्ययन’ विषयात पदवी

अमळनेर : तालुक्यातील इंधवे येथील रहिवासी सध्या मुंबईत महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे उच्च अधिकारी म्हणून कार्यरत असलेले जगदीश मोरे यांनी पत्रकारिता, अधिकारी ते पीएचडी पदवी संपादन करीत उत्तुंग भरारी घेतली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बीए, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून बीसीजे व एमसीजे आणि आता मुंबई विद्यापीठातून पीएचडी पदवी संपादन केली. बीए केल्यानंतर गावाहून पुण्यामार्गे मधली काही थांबे घेत मुंबईपर्यंत केलेल्या 25 वर्षांच्या (रौप्यमहोत्सवी) प्रवासात अनेक अडचणींवर मात करत अखेर पीएचडी प्राप्त झाल्याचा आनंद जगदीश मोरे यांना आहे.
पीएचडी करीत असताना ‘कोर्स वर्क’, इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या (आसीएसएसआर) संशोधन पद्धतीवरील प्रत्येकी पाच दिवसांच्या दोन कार्यशाळा आणि ओरिएंटल कामा इन्स्टिट्यूटमधून ‘समाजशास्र संशोधन पद्धती’ हा सहा महिन्यांचा अर्धवेळ अभ्यासक्रम पूर्ण केला. हे पीएचडीच्या कामाला गती आणि दिशा देण्यासाठी आवश्यकच होते. त्यामुळे ‘माहिती अधिकार अधिनियम, २००५ संदर्भातील प्रसारमाध्यमांच्या भूमिकेचे अन्वेषणात्मक अध्ययन’ हा विषय पूर्णत्वास नेता आला. या मुंबई विद्यापीठातील संज्ञापन व पत्रकारिता विभागप्रमुख व मार्गदर्शक डॉ. सुंदर राजदीप, त्याचबरोबर डॉ.संजय रानडे यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगारातील संजय मोरे यांचे ते बंधू आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन..!