अमळनेर : भारताचे पहिले उपपंतप्रधान तथा एकसंघ भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त येथील दोडे गुर्जर भवन समिती कडून अभिवादन सभा घेत राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा करण्यात आला. भवन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात माजी अध्यक्ष डॉ एल. डी. चौधरी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून माल्यार्पण करण्यात आले. सरकारी वकील अँड राजेंद्र चौधरी प्रमुख पाहुणे होते. प्रताप महाविद्यालयातील प्रा.डॉ धनंजय चौधरी यांनी युवा पिढीला सरदार वल्लभभाई पटेल यांचा जीवनपट व स्वातंत्र्य चळवळीतील कार्य, विविध संस्थाने विलीनीकरण करून अखंड भारत उभा करण्यात योगदान याबाबत मार्गदर्शन केले. यावेेेळी डॉ एल. डी. चौधरी, मगन पाटील, ज्ञानेश्वर पवार यांनीही आपले विचार मांडले.
कार्यक्रमास मंगल पाटील, बळीराम दादा सूर्यवंशी, मगन भाऊसाहेब, एन.आर.चौधरी, पंडीत पाटील, भूषण चौधरी, किशोर पाटील, भरत पाटील, पद्माकर पाटील, के.पी.पाटील, राजेंद्र चौधरी, धनंजय पाटील, योगीराज पाटील, शिवाजी पाटील, प्रतीक चौधरी, मधुकर चौधरी आदी समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण चव्हाण यांनी तर सूत्रसंचालन प्रा.डी.आर.चौधरी यांनी केले. भवन समितीचे सचिव सी.एस.पाटील यांनी आभार मानले.