शिवशाही फाउंडेशन तर्फे अमळनेरच्या ममता विद्यालयात विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप


अमळनेर : येथील ममता विद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनींना “स्वर्गीय भूमिका उमेश काटे” हिच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त शिवशाही फाउंडेशन तर्फे खाऊ वाटप करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच स्वावलंबनाचे धडे देण्यासाठी ममता विद्यालयातील शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे दिसून आले. शाळेतील दिव्यांग विद्यार्थी प्रत्येक उपक्रमात सहभागी होतात. नुकताच या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर सादर केलेल्या गीताचे कौतुक करण्यात आले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित ही करण्यात आले. यावेळी शिवशाही फाउंडेशनच्या अध्यक्ष जयेशकुमार काटे, सचिव उमेश काटे, यशोदीप सोनवणे, वैशाली सोनवणे, प्राथमिक शिक्षिका गायत्री काटे, प्रा निकिता काटे, वेदांत सोनवणे, शाहूराजे काटे, दक्षता काटे आदीसह मुख्याध्यापक विनोद पाटील, शिक्षक राजेंद्र मनोरे, कल्पना ठाकूर, वैशाली राऊळ, वासुदेव कोळी, शांतीलाल पाटील, रामचंद्र धनगर, नामदेव जाधव आदी उपस्थित होते.
Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!