
अमळनेर : येथील शिवरथ प्रतिष्ठान तर्फे गलवाले रोडवरील ८५/ब, प्रताप मिल कंपाऊंड, अमळनेर येथे गुरुवार दिनांक ९ फेब्रुवारी ते बुधवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ या काळात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ॲक्युप्रेशर सुजोक थेरपी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीराची वेळ दररोज सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत असेल. डॉ.राम मनोहर लोहिया आरोग्य जीवन संस्थानचे ॲक्युप्रेशर थेरेपिस्ट डॉ.महेंद्र पिताणी, डॉ.एम आर डँऊकिया व त्यांचे सहकारी यांच्याद्वारे उपचारांची सेवा देण्यात येणार आहे. या शिबिरात मणक्यांचे आजार, सांधेदुखी, पाठीचा त्रास, डोकेदुखी, हाता पायाला मुंग्या, थायरॉईड, ब्लडप्रेशर, दमा, गॅस, अपचन, मानदुखी, चिकनगुनिया, पॅरालिसिस, पोटरी वरील नस आखडणे, कंबर दुखी, लठ्ठपणा, झोप न लागणे, अतिसार, झोपेत लघवी होणे, सायटिका, पोटाचे विकार, मधुमेह, एलर्जी, नाक, कान, घसा यावरील सर्व आजारांवर नैसर्गिक उपचार केले जाणार आहेत. रुग्णांनी उपचारासाठी येताना हात पाय स्वच्छ धुऊन यावयाचे असून सर्व समाजातील रुग्ण बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मार्गदर्शक शिवश्री मनोहर शंकरराव निकम, शिवरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूराव आनंदराव ठाकरे, सचिव शिवमती पुनम बापूराव ठाकरे यांनी केले आहे.
