महाराष्ट्र पत्रकार संघाच्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी संजय सूर्यवंशी; उपाध्यक्ष पदी भूषण चौधरी

राज्य कार्यकारिणी सदस्य पदी ईश्वर महाजन

अमळनेर : महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सन २०२३ या वर्षासाठी राज्य, जिल्हा व तालुका कार्यकारणी समित्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. यात अमळनेर तालुकाध्यक्ष पदी संजय उत्तम सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ईश्वर महाजन यांची राज्य कार्यकारिणी सदस्य पदी नियुक्ती झाली आहे. अन्य तालुका कार्यकारिणीत उपाध्यक्ष – भूषण चौधरी, सचिव – निरंजन पेंढारे, सहसचिव – यदुवीर पाटील, सदस्य – सर्वश्री भूषण बिरारी, विजय पाटील, प्रदीप महाजन, अश्विन पाटील यांचा समावेश आहे. महाराष्ट्र पत्रकार संघात ३६ जिल्हयातील असंख्य पत्रकार बांधवांना संघात काम करण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे, यात निष्णात वकिलांची फौज पत्रकारांच्या पाठीशी उभी केली आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!