जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खवशी येथे विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम रंगला

शाळेला प्रोजेक्टर भेट देण्याचे डॉ.अनिल शिंदे यांचे आश्वासन

अमळनेर : तालुक्यातील खवशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार, दि.२४ फेब्रुवारी रोजी दुपारी शाळेच्या प्रांगणात पार पडले. विविध सादरीकरणाने गुणदर्शनाचा कार्यक्रम रंगला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नामवंत डॉक्टर अनिल शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेरचे उद्योगपती बजरंगशेठ अग्रवाल उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर खवशी येथील सरपंच सौ.जयश्रीताई अरुण देशमुख, सदस्या सौ.गौरी कैलास पाटील, सौ.आशा अरुण गोसावी, सौ.मंदाबाई गुलाब देसले, गणेश बाविस्कर, धनराज पवार, अनिल शिरसाठ यांचेसह अरुण देशमुख, श्यामकांत देशमुख, रोहिदास कापडे, भगवान गोसावी, भागवत सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, सचिन सूर्यवंशी, कैलास पाटील, हेमकांत देसले आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात डॉ.अनिल शिंदे म्हणाले की, श्रध्दा ठेवा पण.. अंधश्रद्धेला बळी पडू नका. अथक परिश्रमच माणसाला पुढे नेतात. मुलांवर संस्कार घडविणे पालकांचे काम असते. आजची पिढी कुठेतरी भरकटत चालली असून शिक्षकांसोबत पालकांनी मुले घडविण्यावर अधिक लक्ष दिल्यास तीच मुले भावी काळात उच्च पदावर असतील असा आशावाद व्यक्त केला. डॉ.अनिल शिंदे यांनी शाळेला प्रोजेक्टर भेट देण्याचे आश्वासन यावेळी दिले. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी कैलास पाटील व भागवत सूर्यवंशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

सलग अडीच तास विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. त्यात बोधकथेवर आधारित लघुनाटिका, समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य सादरीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे, जास्तीत जास्त देशभक्तीपर गीतांचा समावेश करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करत गायिलेल्या गाण्याने तरुणाईचे लक्ष वेधून घेतले. प्रत्येक सादरीकरणास उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिलीच शिवाय दात्यांनी भरघोस रोख बक्षिसेही दिली.

पालकांसाठी हा स्नेहमेळावा एक पर्वणीच होती. महिलांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध शालेय स्पर्धेत नेैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना शालेय साहित्य देण्यात आले. डॉ.अनिल शिंदे यांनी शाळेला प्रोजेक्टर भेट देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ.पूनम पवार व प्रसाद कापडे यांनी संयुक्तरीत्या केले. आभार प्रदर्शन प्रसाद कापडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक हिंमत चौधरी, शिक्षक पंकज शिसोदे, दिलीप कंखरे, शिक्षिका पूनम पवार, शालेय समितीचे अध्यक्ष प्रसाद कापडे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सूर्यवंशी, सदस्य रोहिदास कापडे, युवराज पवार, मेहमूद पिंजारी, सौ.उज्वला महेंद्र पाटील, सौ.जयश्री राकेश मराठे, सौ.सरला बागुल, सौ.सुलभा दिनकर पवार, सौ.जयश्री अरुण देशमुख यांनी प्रयत्न केले. यावेळी पालकवर्ग, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!