
अमळनेर : छत्रपती संभाजी राजे मित्र मंडळ यांच्या वतीने तालुक्यातील आदर्श गाव जवखेडे येथे उतरती कट्टा चौकात छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. आधार फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक आधार पाटील यांच्या हस्ते पूजन करून छत्रपती संभाजीराजे स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सौ.अर्चना पाटील होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव उपस्थित होते.
छत्रपती शंभू राजे यांचे झंजावती जीवन युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन उद्घाटक अशोक पाटील यांनी केले. उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी ग्रामीण सुरक्षा आणि कॅमेरे यांचे महत्व आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले. यावेळी उपसरपंच प्रशांत पाटील, मा. उपसरपंच चुडामण पाटील, मा.सरपंच शामकांत भैय्यासाहेब पाटील यांचेसह ग्रामपंचायत सदस्य, छत्रपती संभाजी राजे मित्र मंडळ, उतरती कट्टा चे युवा सदस्य तसेच आदर्श गाव जवखेडे चे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.