ज्ञानराज प्रतिष्ठान व स्वरांजली गृप तर्फे जुना टाऊनहॉल येथे पार पडला ‘संध्या गीतमाला’ कार्यक्रम

अमळनेर : गुढीपाडव्याचे औचित्य साधून येथील ज्ञानराज प्रतिष्ठान व स्वरांजली वाद्यवृंद ग्रृप तर्फे जुना टाऊनहॉल येथे काल दिनांक २२ मार्च रोजी सुमधुर गीतांचा ‘संध्या गीतमाला’ हा कार्यक्रम पार पडला. सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती, नटराज व गुढीपूजन किशोर देशपांडे व प्रा. प्रभाकर जोशी यांनी केले. सौ.पूजा शाह यांनी आपल्या बहारदार शैलीत निवेदिका म्हणून काम पाहिले. तबलावादक म्हणून देवांश गुरव तर योगेश, गंगाधर कढरे, नानासाहेब शुक्ल यांनी इतर वाद्य वाजवित साथ दिली. गायक कलाकारांनी जुन्या काळी गाजलेल्या लता मंगेशकर, आशा भोसले, महंमद रफी, मुकेश कुमार, किशोरकुमार आदी अनेक कलाकारांच्या आवाजातील गाणी गात कार्यक्रमात रंगत आणली.

चिमुरडी कु.जान्हवी वाडीले ठरली कार्यक्रमाचे आकर्षण…

साधारण तीन वर्षे वयाची चिमुरडी कु.जान्हवी वाडीले हिने श्रोत्यांच्या गर्दीतून वाट काढत स्टेज गाठले आणि आपल्याला काही सांगावयाचे असे निवेदिका सौ.पूजा शाह यांना सांगितले. चिमुरडीचा तो धीटपणा वाखाणण्याजोगा होता. थेट माईक हातात घेऊन ‘सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्ता हमारा…’ हे गाणे गायिले. श्रोत्यांनी तिचे भरभरुन कौतुक केले. सौ.माधुरी पाटील यांनी तिला शंभर रुपये बक्षीस देऊन कौतुक केले. यामुळे ती कार्यक्रमाचे आकर्षण ठरली.

गायक कलाकारांपैकी.. सुनिल वाघ यांनी ‘शोधीसी मानवा राऊळी मंदिरी..’ या सुंदर भक्ती गीताने गायन कार्यक्रमास सुरुवात झाली. यानंतर अनुक्रमे बापूराव ठाकरे यांनी ‘रामजीकी निकली सवारी…’, ‘चांद सी महेबुबा हो मेरी..’, हरिश देशपांडे यांनी ‘रम्य ही स्वर्गाहून लंका…’, ‘प्रथम तुज पाहता..’, सौ.स्नेहा देशपांडे यांनी मराठी गीत ‘तुला पाहते रे…’, मराठी भावगीत ‘रुपेरी वाळूत माळ्याच्या बनात..’, ‘जीवनातली घडी अशीच राहू दे..’, उज्वल पाटील यांनी ‘दिवस तुझे हे फुलायचे…’, भावगीत ‘हीची चाल तुरुतुरु, केस भुरुभुरु.’, सौ.विद्या पाटील यांनी ‘ऐरणीच्या देवा तुला..’, ‘चाफा बोलेना.. चाफा चालेना..’, पूनम अग्रवाल यांनी ‘चंचल सा बदन..चंचल सी किरण..’, ‘तुम्हे मिली नजर के तेरे होश उड गए..’, सौ.योगमाया शिंगाणे यांनी ‘झाल्या तिन्ही सांजा..’, ‘जिथे सागरा धरणी मिळते..’, उज्वल पाटील यांनी ‘सूर तेच छेडिता..’, प्रेमराज पवार यांनी ‘आने से उसके आहे बहार..’, प्रदीप शिंगाणे यांनी भावगीत ‘भातुकलीच्या खेळामधली.. राजा आणिक राणी..’, मिलिंद पाटील यांनी ‘मेरे सपनोकी राणी कब आयेगी तू..’, ही गाणी गायिली.

सामुदायिक गायिलेल्या गाण्यांमध्ये मिलिंद पाटील व स्नेहा देशपांडे यांनी ‘प्रितीचे झुळूझुळू पाणी..’, हरीश देशपांडे, स्नेहा देशपांडे, उज्वल पाटील, सुनिल वाघ यांनी हुतात्मांचे स्मरण करत ‘मराठी पाऊल पडते पुढे…’ हे गीत सामुदायिक गायिले. सौ.योगमाया शिंगाणे व प्रदीप शिंगाणे यांनी एकत्रितपणे ‘छुप गये सारे नजारे..’, सुनिल वाघ व विद्या पाटील यांनी ‘कोशीश करके देखले..सोला बरस की बाली उमर को सलाम..’ गाणे गायिले. याप्रसंगी विवेक भांडारकर, प्रा.अशोक पवार, श्याम संदानशिव, भागवत गुरुजी, देशमाने, प्रा.प्रभाकर जोशी, संजय सूर्यवंशी, विजय पवार, सुधाकर कुलकर्णी, सौ.माधुरी पाटील, सौ.शीला पाटील, सौ.पूनम ठाकरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी सुमारे अडीच तास कार्यक्रम सुरु होता. हॉल श्रोत्यांनी खच्चून भरलेला होता. आभारप्रदर्शन प्रा.जोशी सर यांनी केले. नवोदित कलाकारांना वाव देता यावा हा कार्यक्रमाचा उद्देश होता तो सर्व श्रोत्यांच्या मुळे यशस्वी झाल्याचे ते म्हणाले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!