मारवड महाविद्यालयाच्या ‘आत्मनिर्भर युवती अभियान ‘ शिबिराचा समारोप

अमळनेर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व (कै.) न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सात दिवसीय आत्मनिर्भर युवती अभियान शिबिराचा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. समारोपीय कार्यक्रमात विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी प्रा.डॉ.संदीप नेरकर, प्रताप महाविद्यालय, अमळनेर, अधिसभा सदस्य क.ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव प्रा. डॉ .नलिनी पाटील, प्रताप महाविद्यालय, अमळनेर. अभ्यास मंडळ सदस्य संख्याशास्त्र विभाग ,कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ,जळगाव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंतराव देसले होते. महाविद्यालयाच्या वतीने आलेल्या प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला.

प्रा. डॉ.संदीप नेरकर म्हणाले की, विद्यापीठाचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून या माध्यमातून महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना या शिबिराच्या माध्यमातून विविध आस्थापनाचे ज्ञान मिळवून तेथील कार्यप्रणाली समजून घेण्यास मदत झाली असून आपण इतरांनाही त्याची माहिती द्यावी जेणेकरून अशा शिबिराचा उद्देश खऱ्या अर्थाने सफल होईल. विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना डॉ.नलिनी पाटील म्हणाल्या की, आजच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगात आपण नेहमीच अपडेट राहिले पाहिजे तरच आपण स्पर्धेत टिकू शकतो म्हणून अत्याधुनिक नवनवीन टेक्नॉलॉजी विकसित होत असताना आपण प्रत्येक क्षेत्रातील जास्तीत जास्त ज्ञान मिळवित राहिले पाहिजे.

सात दिवसीय आत्मनिर्भर युवती अभियान शिबिराच्या माध्यमातून आपणास खूप शिकावयास मिळाले. या माहितीचा उपयोग स्वतः तर करालच पण आपण जे शिकलो त्यातून इतरांचे मार्गदर्शन करून त्यांना मदत करावी असे आवाहन प्राचार्य डॉ.वसंतराव देसले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विद्यार्थिनींना केले. विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय पाटील यांनी प्रास्ताविकातून सात दिवशीय शिबिराचा आढावा सादर केला. प्रमुख व्याख्याते प्रा.डॉ.संदीप नेरकर सर यांचा सत्कार विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा.डॉ.संजय पाटील यांनी तर प्रा.डॉ.नलिनी पाटील यांचा सत्कार युवती सभाप्रमुख प्रा.डॉ. नंदा कंधारे यांनी केला. शिबिरार्थी विद्यार्थिनींनी मनोगतातून आपले अनुभव कथन केले. नाजमीन पठाण यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशोर पाटील यांनी तर कोमल पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!