कापसाला प्रतिक्विंटल तेरा हजार रुपये भाव व दरवर्षी पंधरा टक्के वाढ मिळण्याची प्रमुख मागणी

भडगाव : महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भडगाव येथे पाचोरा चौफुलीवर महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनिल देवरे यांच्या नेतृत्वाखाली आज ७ एप्रिल रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. भडगाव तालुकाध्यक्ष अभिमान राघो हाटकर व तालुका कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी, शेतकरी यांच्या पाठबळावर रास्ता रोको आंदोलन यशस्वी झाले. रास्ता रोको आंदोलनावेळी शेतकऱ्यांचे हाती संघटनेचे झेंडे व मागण्यांचे फलक होते. कापसाला प्रतिक्विंटल तेरा हजार रुपये भाव मिळावा व दरवर्षी पंधरा टक्के वाढ व्हावी, महाराष्ट्रातील पाटचाऱ्या व रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करावेत, वीजेचे प्रश्न आदी विविध मागण्या करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

लोकप्रतिनिधींनो.. आता तरी स्वतःला सुधारा व शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा, मुंबई ला गोट्या खेळायला जाऊ नका..!
यापेक्षाही मोठे आंदोलन उभे करु असे सांगितले. यावेळी संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष देविदास पाटील यांनी वडली घटना घडते यासारखे दुर्दैव दुसरे कुठले नसल्याचे सांगितले. भडगाव तालुका उपाध्यक्ष शांताराम आचारी, संपर्कप्रमुख भगवान चौधरी, माहिती प्रमुख विलास वासुदेव देशमुख, खजिनदार मनोज परदेशी यांचेसह अन्य तालुक्यातील शाखांचे पदाधिकारी व तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनावेळी पोलीस प्रशासनाने आपली चोख कामगिरी बजावली.
