राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत शिवक्षेत्र खौशी येथे महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा
अमळनेर : येथील युवा कल्याण प्रतिष्ठान संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत काल दिनांक १९ एप्रिल रोजी सायंकाळी क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व विश्व तत्वज्ञ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर युवा कल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा.अशोक पवार, प्रमुख वक्ते प्रेमराज पवार, समन्वयक बापूराव ठाकरे, ज्येष्ठ मार्गदर्शक अरुण देशमुख, शिक्षक वाय.पी.पाटील, बाल विद्यार्थी वक्ते म्हणून कु.चेतना जगदीश शिंदे, चि.अजिंक्य सोनवणे, कु.प्रणिती योगराज शिरसाठ उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवराय, महात्मा जोतीराव फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे व पुतळ्यांचे पूजन करण्यात आले. यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते गोकुळ शिरसाठ, यशवंत शिरसाठ, अनिल शिरसाठ, जगतराव पवार, सिद्धार्थ शिरसाठ, राहुल पवार, भैय्या पवार, योगराज शिरसाठ यांचे हस्ते करण्यात आला.
“मी सावित्री..” या विषयावर धरणगाव येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळेची इयत्ता चौथी मध्ये शिकणारी नऊ वर्षीय कु.चेतना जगदीश शिंदे हिने सुंदर असे आत्मकथन केले. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायिला. तिच्या वक्तृत्वाने व अदाकारीने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यानंतर सानेगुरुजी विद्यालय अमळनेर चा इयत्ता दहावीचा विद्यार्थी अजिंक्य सोनवणे, खौशी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इयत्ता सहावी ची विद्यार्थिनी कु.प्रणिती योगीराज शिरसाठ यांनी देखील थोर विचारवंतांच्या कार्याविषयी आपले विचार मांडले. उपस्थित श्रोत्यांनी तीनही बाल विद्यार्थी वक्ते यांना रोख बक्षिसे दिली. कु.चेतना हिला मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून तिने आपल्या सोबत च्या बाल वक्त्यांना बक्षिसे देत आपली मोहोर उमटवली. यानंतर प्रमुख वक्ते प्रेमराज पवार यांनी थोर विचारवंतांच्या कार्याविषयी विस्तृत विचार मांडले.
प्रा. अशोक पवार यांनी राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाबाबतची भूमिका विशद करुन ईच्छा असल्यास अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापूराव ठाकरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रसाद कापडे यांनी तर संजय सूर्यवंशी यांनी आभार मानले. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक लोटन फकिरा सूर्यवंशी, रोहिदास कापडे, सूर्यकांत कापडे, भगवान गोसावी, गोकुळ शिरसाठ, सत्तार पिंजारी यांचेसह कैलास सूर्यवंशी, गणेश बाविस्कर, गजानन सूर्यवंशी, संजय कापडे, अनिल शिरसाठ, सचिन सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, प्रसाद कापडे, चंद्रकांत सूर्यवंशी, महेश सूर्यवंशी, धनराज पवार, यशवंत शिरसाठ, भैय्या पवार, जगतराव पवार, सिद्धार्थ शिरसाठ, राहुल पवार, योगराज शिरसाठ, पिरण पिंजारी आदींसह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.