सरस्वती विद्या मंदिर येथे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

अमळनेर : येथील श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर शाळेत शैक्षणिक, सांस्कृतिक, सहशालेय उपक्रम व स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. सुंदर हस्ताक्षर, रंगभरण, लेझीम, गितगायन, समुहगीत गायन, नियमित उपस्थित विद्यार्थी, चित्रकला, रांगोळी स्पर्धा, स्वातंत्र्य दिवस उप्रकम आदींचे सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचा सहभाग होता. वर्षभरात आयोजित विविध स्पर्धा व उपक्रमात ११२ विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

प्रास्ताविक करतांना मुख्याध्यापक रणजित शिंदे म्हणाले की,’शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या गुणात्मक व कलात्मक विकासासाठी कला-क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धांसह सहशालेय उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.’ वर्षभर राबविलेल्या उपक्रम व स्पर्धांमधील यशासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा शाळेचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगत संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष समाधान शेलार, संचालक समाधान पाटील आदींसह शाळेचे मुख्याध्यापक रणजित शिंदे, ज्येष्ठ शिक्षक आनंदा पाटील, शिक्षिका सौ.संगीता पाटील, सौ.गीतांजली पाटील आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासोबत बक्षिसांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक ऋषिकेश महाळपुरकर, धर्मा धनगर यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी पूनम पाटील,शितल पाटील व पालक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!