अमळनेर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी संचालक मंडळाची नुकतीच निवडणूक झाली. त्याचा निकाल आज दि.३० रोजी घोषित करण्यात आला. यात आमदार अनिल भाईदास पाटील व माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने एक हाती सत्ता काबीज करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यात, महाविकास आघाडी ११ , भाजप ०४, व अपक्ष ०१ उमेदवार विजयी झाले आहेत. व्यापारी मतदार संघातून वृषभ प्रकाश पारख व प्रकाश काशिनाथ वाणी यांचे विरोधात अर्ज नसल्याने ते आधीच बिनविरोध विजयी झाले आहेत. अपक्ष तीन उमेदवारांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केल्याने महाविकास आघाडीचे संख्याबळ आता १४ झाले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हा कौल मिळाला आहे. अमळनेर बाजार समिती निवडणूकीत विजयी उमेदवार व मिळालेली मते पुढीलप्रमाणे…
सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदारसंघातून… स्मिता उदय वाघ (डांगर बुद्रुक)- ७२६, अशोक आधार पाटील (लोण खुर्द)- ७२१, सुभाष सुकलाल पाटील (शिरुड)- ६५६, सुरेश पिरण पाटील (निंभोरा)- ५०७, अशोक हिंमतराव पाटील (मांडळ)- ४२१, नितीन बापूराव पाटील (गडखांब)- ४०९, भोजमल मालजी पाटील (रामेश्वर बुद्रुक)- ३९४ मते मिळवून विजयी झालेत. एकूण वैध मतपत्रिका- १०४३, अवैध मतपत्रिका- ७४
सेवा सहकारी संस्था (महिला राखीव) मतदारसंघातून सुषमा वासुदेव देसले (दहिवद)- ६३३, पुष्पा विजय पाटील (झाडी)- ५९१ मते मिळवून विजयी झालेत. एकूण वैध मतपत्रिका १०७५, अवैध मतपत्रिका ४२
सेवा सहकारी संस्था (विमुक्त जाती, भटक्या जमाती) मतदार संघातून समाधान गोरख धनगर (निंभोरा) ६०३ मते मिळवून विजयी झालेत. एकूण वैध मतपत्रिका १०६६ अवैध मतपत्रिका ५१
सेवा सहकारी संस्था (इतर मागास वर्गीय) मतदार संघातून डॉ. अनिल नथ्थू शिंदे (पिळोदे) ७२६ मते मिळवून विजयी झालेत. एकूण वैध मतपत्रिका १०२१ अवैध मतपत्रिका ९६
ग्रामपंचायत (सर्वसाधारण) मतदार संघातून सचिन बाळू पाटील (रंजाणे) ५२४ तर प्रफुल्ल हिरालाल पाटील (मालपूर) ४८९ मते मिळवून विजयी झालेत. एकूण वैध मतपत्रिका ८९४ अवैध मतपत्रिका ८९
ग्रामपंचायत (अनुसूचित जाती जमाती) मतदार संघातून भाईदास सोनू भिल (लोणे-भोणे)- ४३३ मते मिळवून विजयी झालेत. एकूण वैध मतपत्रिका ८६० अवैध मतपत्रिका १२३
ग्रामपंचायत (आर्थिक दुर्बल) मतदार संघातून हिरालाल शांताराम पाटील (दहिवद खुर्द) ४०१ मते मिळवून विजयी झालेत. एकूण वैध मतपत्रिका ८५९ अवैध मतपत्रिका १२४
हमाल मापाडी मतदार संघातून शरद पांडुरंग पाटील (ढेकूसीम) १९६ मते मिळवून विजयी झालेत. एकूण वैध मतपत्रिका ३३६ अवैध मतपत्रिका ०४
व्यापारी मतदार संघातून वृषभ प्रकाश पारखी (अमळनेेर) व प्रकाश काशिनाथ वाणी (अमळनेेर) यांचे विरोधात अर्ज नसल्याने ते आधीच बिनविरोध विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.आर.पाटील यांनी काम पाहिले. विजयी उमेदवारांचे आमदार अनिल पाटील व महाविकास आघाडीने अभिनंदन केले. दिव्यचक्र परिवारातर्फे सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन !