प्रा.अशोक पवार यांच्या भगिनी प्रमिलाताई पाटील यांचे दीर्घ आजाराने निधन

अमळनेेर : दोंडाईचा येथील रहिवासी कै. प्रमिलाताई प्रल्हाद पाटील यांचे काल नाशिक येथे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्या ७९ वर्षांच्या होत्या. अर्धांग वायूचा झटका आल्यानंतर अनेक वर्षांपासून त्यांचेवर उपचार सुरु होते. त्यांचे वास्तव्य दोंडाईचा येथे होते. नाशिक येथे १२ मे २०२३ ला सकाळी १०.०० वाजता त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा विविध चळवळीत सक्रिय असलेले प्रा. अशोक पवार यांच्या त्या जेष्ठ भगिनी होत. राष्ट्र सेवा दल, छात्र भारती, अंनिस, बहुजन मूव्हमेंट, पुरोगामी मित्र परिवार, पाटील आणि पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!