खासदार उन्मेष पाटील व स्थानिक आमदारांच्या हस्ते झाले भूमिपूजन
अमळनेेर : देशातील दुर्मीळ असलेल्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर मंगळग्रह सेवा संस्थेला शासनाच्या पर्यटन विभागातर्फे विविध विकास कामांसाठी ४ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून मंदिर परिसरातील जागेत हेलिपॅड, कार पार्किंग, सोलर सिस्टिम, कॅफेटेरियाच्या जागेचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते दिनांक ६ मे रोजी करण्यात आले. यावेळी भाजपचे खासदार उन्मेष पाटील, राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील, भाजपचे माजी आमदार डॉ बी.एस.पाटील, तसेच माजी आमदार स्मिता वाघ, मंगळग्रह मंदिर संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. मान्यवरांचे हस्ते नारळ वाढवून विधिवत मंत्रोपच्चारात विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले. स्वत:च्या मालकीचे हेलीपॅड असलेले अमळनेर मंगळग्रह मंदिर हे राज्यातील एकमेव तीर्थ क्षेत्र असल्याचा दावा मंदिर संस्थानकडून करण्यात आला आहे.
खासदार उन्मेष पाटील म्हणाले की, खानदेशचा सुपुत्र म्हणून भूमिपूजनाचा मान मिळाला हे माझे भाग्य आहे. संस्थेने प्रकल्पाच्या विकासासाठी पावित्र्य जपत तसेच सामाजिक जाणीव ठेवून प्रवास सुरू ठेवण्याबरोबरच तरुणांना रोजगारदेखील उपलब्ध करुन दिला आहे. येणाऱ्या काळात अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासित केले. आमदार अनिल भाईदास पाटील म्हणाले की, मंगळग्रह संस्थेला मंजूर झालेल्या २५ कोटींपैकी उर्वरित २० कोटी रुपये लवकरच आणून मंदिर परिसरात भरीव विकासकामे करु.
यावेळी पोलीस निरीक्षक विजय शिंदे, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, माजी जि.प.सदस्य ॲड. व्ही.आर. पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, राकेश पाटील, प्रफुल्ल पाटील, विक्रांत पाटील, एस. बी.बैसाने, नरेश कांबळे, ललित सौंडागर, जयवंत पाटील, डॉ. अविनाश जोशी, विक्रांत पाटील, मोहन सातपुते, प्रवीण जैन, पंकज मुंदडे, सुंदर पट्टीचे सुरेश पाटील, ॲड.प्रदीप कुलकर्णी, राजेंद्र निकुंभ, भागवत पाटील, डॉ. विजय पवार, प्रशांत सिंघवी, नरेंद्र निकुंभ, मनीष जोशी, अनिल रायसोनी, मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त जयश्री साबे, सेवेकरी उज्वला शाह, आर. टी.पाटील, आशिष चौधरी, व्ही.व्ही.कुलकर्णी, पी. एल.मेखा आदी उपस्थित होते. मंदिरातील पुजारी प्रसाद भंडारी, जयेंद्र वैद्य, तुषार दिक्षित, मेहुल कुलकर्णी, यतीन जोशी यांनी पौरोहित्य केले. मंगळग्रह मंदिर संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी सूत्रसंचालन केले.