माध्यमिक आणि महाविद्यालयीन अशा दोन गटासाठी स्पर्धा असून प्रत्येक गटातील तीन विजेत्यांचा स्मृतिचिन्ह देऊन होणार गौरव

अमळनेर : संगणकीय युगात लेखन दुर्लक्षित होत असताना शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांना लेखनाची आवड निर्माण होऊन हस्ताक्षर सुधारण्यासाठी यमुनाई प्रतिष्ठान, अमळनेेर तर्फे ‘निबंध लेखनातून सुंदर हस्ताक्षर स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. तालुक्यातील खौशी बुll विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी च्या माजी संचालिका कै.यमुनाबाई उत्तम सूर्यवंशी यांचे प्रथम स्मृतिदिनानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेचे नियम असे… स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. स्पर्धा दोन गटात असून माध्यमिक गट – इ.५ वी ते इ.१० वी आणि महाविद्यालयीन गट – इ.११ वी ते पदवीधर याप्रमाणे असेल. दोन्ही गटांसाठी निबंधाचा विषय स्वतंत्र असून माध्यमिक गटासाठी “आई” तर महाविद्यालयीन गटासाठी “अनिष्ट प्रथा व समाज” या विषयावर लेखन हवे. विषयानुरूप नवे हेडींग देता येईल. फक्त अमळनेर तालुक्यातील शिक्षण घेत असलेले विद्यार्थी विद्यार्थिनी स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. स्पर्धकांनी आपल्या स्व हस्ताक्षरात दिलेल्या विषयावर मराठी, हिंदी अथवा इंग्रजी भाषेत लेखन केलेले असावे. दोनही गटासाठी १००० ते १५०० शब्द मर्यादा असेल. निबंध लेखन करताना आपण शिक्षक, पालक यांचेसह इतरांचे मार्गदर्शन घेऊ शकता. पारदर्शकपणे विजेता निवड व्हावी यासाठी प्रत्येक गटासाठी स्वतंत्र परीक्षक समिती नेमण्यात येईल. सर्वांना स्पर्धा परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. निबंध लेखनाचा आशय, व्याकरण, मांडणी व सुंदर हस्ताक्षर या गोष्टी विचारात घेऊन दोन्ही गटांतून स्वतंत्रपणे प्रथम, द्वितीय व एक उत्तेजनार्थ विजेते निवडण्यात येतील. ‘यमुनाई प्रतिष्ठान’ तर्फे स्पर्धेतील दोन्ही गटांतील सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र व विजेत्यांना आकर्षक स्मृतिचिन्ह देण्यात येईल. लेखन साहित्य पाठविताना “निबंध लेखनातून सुंदर हस्ताक्षर स्पर्धेसाठी” असा उल्लेख करुन पाठवावे. स्पर्धकाने आपले पूर्ण नाव, निवासाचा पूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो सह आपले लेखन साहित्य बंद लिफाफ्यातून दिनांक १५ जून २०२३ पर्यंत संस्थापक अध्यक्ष, यमुनाई प्रतिष्ठान, प्लॉट ८० अ, श्रीमंत प्रतापशेठ नगर, अमळनेर, जि.जळगाव या पत्यावर पोस्टाने / कुरिअर ने अथवा skumar.suryawanshi@gmail.com या ई मेल वर PDF फाईल पाठवावी. लेखन साहित्याची दुसरी प्रत आपल्याकडे असू द्यावी. जून २०२३ अखेर पर्यंत स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येईल. आवश्यकता भासल्यास स्पर्धेचे नियम बदलण्याचे अधिकार आयोजकांना राहतील. या स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष संजय सूर्यवंशी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९८५०८१५३४२ वर संपर्क साधावा.