‘शाळा- आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत अमळनेरला दहावी वर्गातील गुणवंताचा सन्मान

अमळनेर : येथील सावित्रीबाई फुले कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावी वर्गाचा निकाल १०० टक्के लागला. या पार्श्वभूमीवर ‘शाळा- आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत गुणवंत सावित्रीच्या लेकींचा आई- वडिलांसह घरी जाऊन सन्मान केला. गुणवंतांना पेढे भरवून हा आनंदाचा क्षण साजरा केला. यात दिव्या रवींद्र खैरनार (रा.सुरत) हिने ८८ टक्के गुण मिळवून प्रथम, हर्षदा सुनील मोतीराळे (रा.सडावण) हिने ८६ टक्के गुण मिळवून द्वितीय, मयुरी विठ्ठल पाटील (बहादरवाडी) हिने ८५.४० टक्के गुण मिळवून तृतीय तर दिव्या अनिल पाटील (रा.खोकरपाट) हिने ८५ टक्के गुण मिळवून चतुर्थ क्रमांक मिळविला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व गुणवंत विद्यार्थिनींचा प्राचार्या गायत्री भदाणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षक व्ही सी.पाटील, कल्पना महंत, उमेश काटे, किरण पाटील यांच्या सह पालक विठ्ठल युवराज पाटील, प्रतिभा पाटील , जिजाबाई पाटील, अनिल मानसिंग पाटील, माया पाटील, गोकुळ पाटील, नारायण पाटील, शुभम पाटील आदी उपस्थित होते. व्ही सी पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर उमेश काटे यांनी आभार मानले. ग्रामीण भागात अनोख्या पध्द्तीने झालेल्या या सन्मानाने पालक, विद्यार्थी सुखावले आहेत. दरम्यान दहावी परीक्षेला प्रविष्ट असलेल्या २० विद्यार्थिनी विशेष प्राविण्यासह तर ७ विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, संस्थेच्या मार्गदर्शिका शिलाताई पाटील, कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, प्रशासकीय अधिकारी डी.बी. पाटील, शिक्षण मानद संचालक प्रा.सुनील गरुड, प्राचार्य गायत्री भदाणे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!