इंदुबाई सूर्यवंशी यांचे अल्पशा आजाराने निधन

अमळनेर : तालुक्यातील खवशी येथील मूळ रहिवासी इंदुबाई दगा सूर्यवंशी (वय- ८६ वर्षे)  यांचे शुक्रवारी सायंकाळी ८.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. पुंडलिक दगा सूर्यवंशी व कालिदास दगा सूर्यवंशी यांच्या त्या आई होत. खवशी येथील स्मशानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. राहत्या निवासस्थानापासून सकाळी ११ वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. दशक्रिया विधी रविवार, दिनांक २५ जून रोजी खवशी येथे होणार आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!