नीट परीक्षेत कु.भूमी रंगराव पाटील ९९.९० गुणांनी उत्तीर्ण

अमळनेर : येथील प्रताप नगर मधील रहिवासी तथा लोंढवे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक रंगराव पुंडलिक पाटील यांची मुलगी कु.भूमी पाटील हिने नीट परीक्षेत ९९.९० गुण प्राप्त करुन उज्वल यश संपादन केले आहे. रंगराव पाटील हे तालुक्यातील तरवाडे येथील मूळ रहिवासी आहेत. भूमी हिला ७२० पैकी ६६५ गुण मिळाले आहेत. वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या नॅशनल इलिजिबीटी टेस्ट (नीट) परीक्षेचा ऑनलाइन निकाल नुकताच जाहीर झाला. तिला OBC प्रवर्गातून ऑल इंडिया रँक १२२९ मिळाला आहे.

कु.भूमी पाटील हिचे इयत्ता आठवी पर्यंत शिक्षण अमळनेर येथील ग्लोबल स्कूल, इयत्ता नववी व दहावी भुसावळ येथील जवाहर नवोदय विद्यालय तर पुढील दोन वर्षे अमळनेेर येथील एन.टी.मुंदडा कनिष्ठ महाविद्यालयात पूर्ण झाले आहे. कोटा (राजस्थान) येथे आईसोबत राहून तिने अभ्यासात सातत्य ठेवले व आपली गुणवत्ता सिद्ध केली. वैद्यकीय क्षेत्रात प्रामाणिकपणे सेवा करण्याचा तिचा मानस आहे. कु.भूमी ला तिचे आई, वडील, शाळेचे शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे मन:पुर्वक अभिनंदन !

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!