अभिमन कापडे (गुरुजी) यांचे वृद्धापकाळाने निधन

अमळनेर : तालुक्यातील खवशी येथील रहिवासी तथा जिल्हा परिषद शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक अभिमन वामन कापडे (गुरुजी) यांचे आज ता.३० जून रोजी सकाळी ११ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते ८५ वर्षांचे होते. त्यांचे पश्चात एक मुलगा, सून, पाच मुली, नातवंडे असा परिवार आहे. पितांबर वामन कापडे यांचे ते बंधू तर विकास अभिमन कापडे यांचे वडील होत. उद्या ता.१ रोजी सकाळी ९ वाजता त्यांचे राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा नेण्यात येणार आहे. दशक्रियाविधी, गंधमुक्ती व उत्तरकार्य रविवार, ता.९ रोजी खवशी येथे आयोजिलेले आहे. गुरुजींनी वेळ प्रसंगी कठोर भुमिका घेत गाव व परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना घडविले आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली..!

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!