श्री दत्त सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, शिरुड तर्फे प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या सहकार्याने आयोजित विविध उपक्रमांचा समारोप

समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना बक्षिसांचे झाले वाटप


अमळनेर : तालुक्यातील शिरूड येथील श्री दत्त सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय तर्फे प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या सहकार्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध उपक्रमांतर्गत माध्यमिक हायस्कूल तसेच जिल्हा परिषद मराठी शाळेत लहान व मोठ्या अशा दोन गटात शालेय निबंध, वक्तृत्व, चित्रकला, शुद्धलेखन स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचा समारोप श्री विनायकराव झिपरू माध्यमिक हायस्कूल च्या प्रांगणात नुकताच दि. २२ जुलै रोजी संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी केंद्रप्रमुख आण्णासाहेब बन्सीलाल भागवत गुरुजी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच भाईदास पितांबर पाटील, मुडी ग्राम विकास शिक्षण संस्थेचे संचालक जयवंतराव अमृतराव पाटील होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत ग्रंथालयाचे अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी केले. विविध उपक्रमाचे आयोजन करणे बाबत शासन आदेशानुसार दिनांक १९ जून २०२३ ते दिनांक १८ जुलै २०२३ या काळात वाचन दिवस, वाचन पंधरवडा, वाचन महिना साजरा करण्यात आला. शिरूड च्या श्री दत्त वाचनालय व ग्रंथालयाच्या माध्यमातून ग्रंथ देवघेव करणे तसेच वाचन संस्कृतीत वाढ होणे बाबतच्या उपक्रमांतर्गत वादविवाद व चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस व पुष्प देऊन गुणगौरव करण्यात आला. यावेळी सन २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या ग्रंथपाल प्रमाणपत्र परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या सौ. चेतना चेतन पाटील यांचा सत्कार सौ. शिंदे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. व्ही. बागुल सर यांनी केले तर आभार शशिकांत पाटील यांनी मानले. कार्यक्रमास पदाधिकारी काळू नाना पाटील, भालेराव उत्तम पाटील, विजय हिम्मतराव पाटील, डॉक्टर के. पी. पाटील, भाऊराव बाबुराव पाटील, भाऊसाहेब पाटील, नितीन पाटील, वसंतराव भगवान पाटील, भाईदास पाटील, विजय बोरसे, आबा कासार, शांताराम कोळी, दीपक मिस्तरी, पंकज पाटील, हिरामण पाटील, पुंजू पाटील, आनंदराव पाटील, भास्कर पाटील, सुकलाल पाटील, अशोक महाजन, हायस्कूलचे व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थिनी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!