अमळनेर : येथील महाविकास आघाडी तर्फे मणिपूर येथे महिलांवर झालेल्या अत्याचारा विरोधात निषेध मोर्चा काढून मणिपूर सरकार बरखास्त करून पीडित महिलांना न्याय मिळावा यासाठी प्रांताधिकारी महादेव खेडकर यांना निवेदन देण्यात आले. शहरातील महाराणा प्रताप चौकातून प्रांताधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा नेण्यात आला यावेळी महाविकास आघाडी तर्फे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मणिपुर येथे अत्याचाराच्या घटना घडत असताना देशाचे पंतप्रधान शांततेचे आवाहन करु शकले नाहीत. अत्याचाराच्या घटना रोखण्यास मणिपूर राज्य सरकार व केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.
निवेदन देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील, शिवसेना (उबाठा) चे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष श्याम पाटील, शेतकरी नेते सुभाष पाटील, संदीप घोरपडे, सुलोचना वाघ, उज्वला कदम, प्रताप शिंपी, मनोज शर्मा, संदीप शिंपी, जयंत पाटील, नरेंद्र संदानशिव, धनगर दला पाटील, सुरेश पाटील, संभाजी पाटील, विजय पाटील, श्याम पवार, गजेंद्र साळुंखे, सचिन वाघ, गोविंद सोनवणे, संजय चव्हाण, कल्पना वानखेडे, मनीषा परब, धर्मेंद्र मोरे, काशिनाथ पाटील, तुकाराम चौधरी, निळकंठ पाटील, संजय चव्हाण, गोविंदा सोनवणे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.