बँक ऑफ बडौदा निंभोरा शाखेकडून पिंगळवाडे जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप

अमळनेर : बॅंक अॉफ बडौदा च्या ११६ व्या वर्धापन दिनानिमित्त बँक ऑफ बडौदा, निंभोरा शाखेकडून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंगळवाडे शाळेतील १०० विद्यार्थ्यांना कंपासपेटी, चित्रकला वही, लेखन साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका वंदना ठेंग होत्या. लेखन साहित्याचे वितरण बँक ऑफ बडोदा, निंभोरा शाखेचे शाखाधिकारी नितीन वसावे यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी बँकेचे कर्मचारी महेंद्र पाटील, मिल के चलो असोसिएशनचे विनायक पाटील, चेतन वैराळे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व समजावतांना शाखाधिकारी नितीन वसावे यांनी स्वत:चे अनुभव कथन करत विद्यार्थ्यांनी मेहनत व अभ्यास करुन मोठे अधिकारी व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या. वैयक्तिक तथा बँकेतर्फे वेळोवेळी आवश्यक ती मदत करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत निवड झालेल्या प्रदीप पारधी याचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वितेसाठी मुख्याध्यापक वंदना ठेंग, उपशिक्षक दत्तात्रय सोनवणे, प्रविण पाटील, रविंद्र पाटील, वंदना सोनवणे, बँक कर्मचारी आदित्य घोगरे, जयंत बिऱ्हाडे, महेंद्र पाटील, रविंद्र देशमुख यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रविण पाटील यांनी केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!