साहित्याला वास्तवाचे भान देणारे वैचारिक वादळ अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट उलगडला

अमळनेर : दरवर्षी टिळक विद्यापीठाची इंग्रजी विषयाची परीक्षा घेतली जाते अशा निम, ता. अमळनेर येथील नंदादीप हायस्कूल मध्ये नुकतीच अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल चौधरी हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए. जी. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख वक्ते एस. एच. भवरे यांनी प्रतिमा पूजन केले.
श्री एस. एच. भवरे यांनी अण्णाभाऊ यांच्या बालपणापासून ते त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक ,प्रबोधनात्मक कार्यावर प्रकाशझोत टाकला. त्यात त्यांनी घेतलेले व्रत ज्यामुळे साहित्याला वेगळी कलाटणी मिळाली. ‘फकिरा’ हया उच्चतम कादंबरीने साऱ्या भारतात नाव कमविले. वास्तववादी लेखनाने साहित्य निकोप बनले. वैचारिक बदल घडविण्याचे काम अण्णाभाऊ यांनी केले. माझी मैना ही छक्कड साहित्यातील उच्च कोटीचे काव्य ठरली. फकिरा कादंबरी एका विद्रोही नायकाची कथा आहे. गरिब, वंचित, उपेक्षित लोकांचा वाली असा होता की त्याने इंग्रजांना बेजार केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना शाळेत नियमितपणे विद्यार्थ्यांच्या हिताचे, गुणवत्तापूर्ण कार्यक्रम घेतले जातात. तथापि, मुलांनी महापुरुष यांच्या जयंती, पुण्यतिथी कार्यक्रमातून चांगले गुण घेऊन उज्ज्वल भविष्य घडविले पाहिजे असे मुख्याध्यापक अनिल चौधरी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनीही महापुरुषांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. विद्यार्थीनीने सुंदर पध्दतीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन एस.एच. सुतार यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी व्ही. एच. चौधरी, व्ही. एम चौधरी, एस. वाय. शिंगाणे यांनी परिश्रम घेतले.