महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडें च्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला जोडे मारून निषेध व दहन

कारवाईसाठी तहसीलदारांना दिले लेखी निवेदन

अमळनेर : येथील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, माळी समाज पंच मंडळ, क्षेत्रीय फुलमाळी समाज, क्षेत्रीय कांच माळी समाज, सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्या तर्फे माळी वाडा येथील क्रांतीसूर्य महात्मा फुले प्रेरणा चौकात मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे च्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला जोडे मारून घोषणा देत निषेध नोंदविला व पुतळ्याचे दहन करण्यात आले. मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे मानसिक संतुलन बिघडल्याप्रमाणे वागत असून थोर महापुरुषांबद्दल घाणेरडी भाषा वापरुन अवमानकारक वक्तव्य करीत आहे. यामुळे मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे वर गुन्हा नोंदवून कडक कारवाई करावी अथवा येरवडा येथील मनोरुग्णांच्या तुरुंगात डांबून ठेवावे अशा मागणी चे निवेदन विविध पुरोगामी संघटनांचे वतीने अमळनेर चे तहसीलदारांना काल देण्यात आले. निवेदनाची प्रत तहसीलदार यांचेमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात येणार आहे.

मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे वर तातडीने योग्य कारवाई न झाल्यास महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा समता परिषद व माळी महासंघातर्फे देण्यात आला आहे. मागील काही दिवसांपूर्वी मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे ने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचेबद्दल अवमानकारक शब्द वापरून अशांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे समाजात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी संबंधितास कडक शासन व्हावे व येरवडा तुरुंगात मनोरुग्णांच्या समवेत डांबून ठेवावे अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देताना जळगाव जिल्हा समता परिषदेचे उपाध्यक्ष भीमराव महाजन, शहराध्यक्ष प्रताप पाटील, माळी समाजाचे अध्यक्ष मनोहर महाजन, महाराष्ट्र माळी संघाचे तालुकाध्यक्ष महेंद्र महाजन, माजी नगरसेवक देविदास महाजन, गंगाराम महाजन, क्षेत्रीय फुलमाळी समाजाचे उपाध्यक्ष दिनेश माळी, मा. उपनगराध्यक्ष पांडुरंग महाजन, गणेश महाजन, गुलाब महाजन, ॲड. सुदाम महाजन, ॲड. कुंदन साळुंखे, प्रा. अशोक पवार, मा. उपनगराध्यक्ष अबू महाजन, साखरलाल महाजन, गणेश महाजन, ॲड. रमाकांत माळी, अशोक महाजन, बी. आर. महाजन, रमेश महाजन, अशोक महाजन, संजय महाजन, संदीप महाजन, ईश्वर चौधरी, योगेश महाजन, प्रकाश महाजन, सुनील महाजन श्याम पाटील, विठ्ठल पाटील, संजय सूर्यवंशी, दयाराम पाटील, जाकीर मेवाती, अनिल महाजन, सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या रंजना महाजन, चित्रकला महाजन, ज्योती महाजन, प्रतिभा महाजन, रत्नाताई महाजन, लताबाई महाजन, प्रमिला महाजन, मनीषा महाजन, अर्चना महाजन, स्मिता महाजन यांचे सह विविध पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!