खवशी जि. प. उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप


अमळनेर : सालाबादाप्रमाणे शासनाकडून विद्यार्थ्यांना गणवेशासाठी निधी मंजुर झाला. या निधीतून विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करुन खवशी जि प उच्च प्राथमिक शाळेत नुकतेच वाटप करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रसाद कापडे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सूर्यवंशी, ज्येष्ठ सदस्य रोहिदास कापडे आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका पूनम पवार यांनी केले. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक हिम्मत चौधरी, उप शिक्षक पंकज शिसोदे, दिलीप कंखरे, अजय कोळी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!