ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीदूतांचे खौशी येथे मार्गदर्शन

अमळनेर : महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, धुळे येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी कृषीदूत कल्पेश बागुल, शिवम बाविस्कर, चेतन चव्हाण, प्रशांत गोसावी, संदिप देवरे, कल्पेश महाजन आदी खौशी गावातील प्रगतिशील शेतकरी रोहीदास कापडे यांच्या शेतात प्रत्यक्ष महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती देत आहेत.

ग्रामीण कृषि जागरूकता आणि कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत सुरु असलेल्या या कार्यक्रमांतर्गत तणनियंत्रण कसे कंरावे ? या बाबत प्रात्यक्षिक सादर केले. या मध्ये तणनाशक वापरताना तणनाशकाची पिकनिहाय शिफारस, तणनाशक वापरण्याची वेळ आणि पद्धत आणि तणनाशकाची मात्रा किती ? एकात्मिक पद्धतीने तण नियंत्रण कसे कंरावे ? फवारण्या करताना कशी काळजी घ्यावी ? आदीवर मार्गदर्शन केले. यावेळी गावातील रोहिदास कापडे, मधुकर बाविस्कर, लोटन हिलाल पाटील, व तरुणांनी उपस्थिती देऊन प्रात्यक्षिकाचा लाभ घेतला.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!