ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या वतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलासराव पाटील यांचा सत्कार

चांगल्या कामात झोकून देण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही : प्रा. डॉ. एस.ओ.माळी

अमळनेर : ओ. बी. सी शिक्षक असोसिएशन ही पुरोगामी चळवळीत योगदान देणारी व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या समस्येला पर्याय देणारी संघटना आहे. या संघटनेचे संस्थापक विलास पाटील हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. यानिमित्त जळगाव ओ.बी.सी. शिक्षक असोसिएशन मार्फत साने गुरूजी वाचनालयात कार्यक्रम घेण्यात आला. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्रताप काॅलेज अमळनेरचे निवृत प्राचार्य एस.ओ. माळी तर प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक गोकुळ बागुल, विजय पवार, प्रकाश पाटील, बी. एस. जाधव व सत्कारमूर्ती विलासराव पाटील होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलासराव पाटील यांनी आपण कसे घडलो ? अडचणींवर मात करत कसा प्रवास केला ? याबाबत माहिती दिली. आपल्याला वडिलांकडून कडक शिस्त, औदार्य, दातृत्व याचा अनमोल वारसा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आज फुटीरतावादी प्रवृत्तीमुळे पुरोगामी चळवळी खंबीरपणे उभ्या राहू शकल्या नाही अशी खंत व्यक्त केली. आपण पुढील आयुष्य हे पुरोगामी चळवळीसाठी अधिक प्रमाणात देऊ अशी ग्वाही दिली. आपण लाचारी पत्करली नाही. त्यामुळे खडतर प्रवाहात टिकून असल्याचे त्यांनी सांगितले.

साहित्यिक गोकुळ बागुल यांनी न थकणारे, सदैव तत्पर, उत्साही व चळवळीचे नेतृत्व करणारे धडाडीचे नेते म्हणून विलास पाटील यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. विजयसिंह पवार (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक) म्हणाले की, विलास पाटील यांनी देवळी येथे मुलामुलींसाठी शाळा सुरू करून गावाच्या प्रगतीत भर टाकली. मुली शिकू लागल्या. एक नि:स्पृह काम करणारा संस्थाचालक म्हणून विलास पाटील यांचा उल्लेख केला.

अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य माळी सरांनी कोणत्याही चांगल्या कामात झोकून देण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही. जास्तीत जास्त पुस्तके वाचण्यात वेळ दयावा. माणसे जोडीत जावे असे सत्कार्य करावे असे नमूद केले. यावेळी नवनियुक्त मुख्याध्यापक व असोसिएशन चे पदाधिकारी एन. आर. चौधरी व सेवानिवृत्त शिक्षक एन.ए.साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी असोसिएशन चे पदाधिकाऱ्यांकडून विलास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एन. ए. साळूंखे, प्रकाश पाटील, एन. आर. चौधरी, दीपक पवार, अश्विन पाटील, सोपान भवरे, सुरेश महाजन, आर. आर. सोनवणे, एम. आर. तडवी, मनोहर पाटील, सुधीर चौधरी, अजय भामरे आदी उपस्थित होते. पत्रकार अजय भामरे व सोपान भवरे लेखनमंच हे पुरोगामी साप्ताहिक सडेतोड पध्दतीने चालवितात म्हणून विलास पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए. सोनवणे सर यांनी तर आभार ईश्वर महाजन यांनी मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!