स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विविध संस्था, शाळांमध्ये ध्वजारोहण, स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांचे स्मरण

अमळनेर : तालुक्यात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध संस्था, शाळांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांचे स्मरण करत माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने काही ठिकाणी विविध स्पर्धांचे आयोजन करुन बक्षिसे देण्यात आली. विद्यार्थ्यांनी भारत मातेसह विविध महापुरुषांच्या वेशभूषा धारण करीत देशभक्तीपर गीते सादर केलीत. शाळांनी विद्यार्थी प्रभातफेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप करण्यात आले.

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती

कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय, अमळनेर येथे बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शेतात पिकवलेला माल ज्या बाजार समितीत विकायला यायचो त्याच बाजार समितीचा सभापती होवून ध्वजारोहण करण्याचा बहुमान मिळाल्याचा आनंद अशोक पाटील यांनी व्यक्त केला. याप्रसंगी उपसभापती सुरेश पाटील, भोजमल पाटील, डॉ.अशोक पाटील, सौ. पुष्पा पाटील, सौ.सुषमा देसले, नितीन पाटील, भाईदास भिल, ऋषभ पारेख, शरद पाटील, गटसाचिव संघटना अध्यक्ष विजय पाटील, कृ. उ. बा. सचिव उमेश राठोड, पराग देसले, विनायक पाटील आदी उपस्थित होते.

सरस्वती विद्या मंदिर, अमळनेर

सरस्वती विद्या मंदिर येथे श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष भिमराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अशोक पाटील कार्याध्यक्ष समाधान शेलार, विनायक पाटील, पराग देसले उपस्थित होते. मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यासाठी त्याग, बलिदान करणाऱ्या महापुरुष, क्रांतिकारक विर सैनिकांचे स्मरणासह आदर्श नागरिकाचे आचरण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी भारत मातेसह विविध महापुरुषांच्या वेशभूषा धारण करीत देशभक्तीपर गीते सादर केलीत. सरस्वती विद्या मंदिर येथून ‘भारत माता की जय…’ घोषणा करीत प्रभातफेरीला सुरुवात करण्यात आली. शंकर नगर, बळीराजा स्मारक, विश्राम गृह, बस स्टँड, पाचपाऊली देवी मंदिर मार्गे तिरंगा चौक येथे न. प. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचप्राण शपथ घेत कार्यक्रमस्थळी समारोप करण्यात आला. कार्यक्रम यशस्वितेसाठी आनंदा पाटील, सौ. संगीता पाटील, सौ. गीतांजली पाटील, ऋषिकेश महाळपूरकर, धर्मा धनगर, सागर भावसार, किरण पाटील आदींनी परिश्रम घेतले.

खवशी येथे जि. प. उच्च प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालय व डॉ. आंबेडकर स्मारक चौकात ध्वजारोहण

अमळनेर तालुक्यातील खवशी येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समितीचे ज्येष्ठ सदस्य रोहीदास कापडे ग्रामपंचायत कार्यालय आवारात उपसरपंच गणेश बावीस्कर तर डॉ. आंबेडकर चौकात ग्रामपंचायत सदस्य धनराज पवार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गावातील माजी सैनिक भालेराव रतन सुर्यवंशी व नरेंद्र प्रकाश सुर्यवंशी यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. रोहीदास कापडे यांचे तर्फे विद्यार्थ्यांना बिस्किट पुडे वाटप करण्यात आले. शाळेतून विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढून ग्रामपंचायत आवारात आणून तेथे ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायतच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. स्वराज्य निर्माते राजे छत्रपती शिवराय यांच्या स्मारकाचे पूजन व माल्यार्पण गुलाब हेमकांत देसले यांनी तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे ग्रामपंचायत सदस्य धनराज पवार यांच्या हस्ते करण्यात आले. विर एकलव्य फलकाचे पूजन माजी सैनिक नरेंद्र सूर्यवंशी यांनी केले.

कार्यक्रमास ग्रामपंचायत उपसरपंच गणेश बाविस्कर, धनराज पवार, अनिल शिरसाठ, सदस्या आशाताई गोसावी, नंदाताई देसले, गौरीताई सूर्यवंशी, ग्रामसेविका पवार मॅडम, वि. का. सोसायटी चे चेअरमन गजानन सूर्यवंशी आदी पदाधिकाऱ्यांसह अंगणवाडी सेविका वंदना सूर्यवंशी, ज्योती देसले, मदतनीस मनीषा कापडे, मेघा सैंदाने, आशा वर्कर आशा शिरसाठ, बचत गटाच्या सौ. सुनिता सूर्यवंशी, सेवा संस्थेच्या ललिता सूर्यवंशी, शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या जयश्री मराठे व जि. प. उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षकवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!