‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानांतर्गत खवशी जि. प. शाळेत पंचप्राण शपथ

अमळनेर : तालुक्यातील खवशी येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या अभियानांतर्गत ९ ऑगस्ट रोजी पंचप्राण शपथ घेण्यात आली. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मातीपासून सुबक दिवे बनविले. दिव्यांच्या साक्षीने विद्यार्थ्यांनी भारताच्या एकात्मतेची शपथ घेतली. यावेळी क्रांतिदिन तसेच आदिवासी दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना आदिवासी संस्कृतीचे महत्व सांगण्यात आले. यावेळी आदिवासी नृत्यांवर विद्यार्थ्यांनी धमाल नृत्य केले. यावेळी मुख्याध्यापक हिम्मत चौधरी, उपशिक्षक दिलीप कंखरे, पंकज शिसोदे, अजय कोळी, पूनम पवार उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!