परमपूज्य श्री गायत्री नंदनजी महाराज यांच्या अमृतवाणीतून कथा होणार

अमळनेर : शहरात श्रीमद् भागवत कथा प्रेमयज्ञ ला दिनांक १ सप्टेंबर पासून पोथी पूजन व व्यासपूजनाने प्रारंभ झाला आहे. श्रीधाम अयोध्या निवासी कथाव्यास परमपूज्य श्री गायत्री नंदनजी महाराज यांच्या अमृतवाणीतून ही कथा होणार आहे तर श्री राम कथा मर्मज्ञ अयोध्या निवासी श्री सोनू पुजारीजी महाराज कथन करणार आहेत. काल श्री गायत्री नंदनजी महाराजांचे आगमन झाल्यानंतर सकाळी श्री स्वामीनारायण मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. तत्पूर्वी माजी जि. प. सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते स्वामीनारायण मंदिरात पोथी पूजन व व्यासपूजन होऊन शोभायात्रेस सुरुवात झाली. श्री गायत्री नंदनजी महाराज रथावर विराजमान झाले होते. महिला भगिनींनी लाल रंगाची साडी परिधान करुन डोक्यावर कलश घेतले होते. यावेळी बजरंगलाल अग्रवाल, विनोद अग्रवाल, विवेक लाठी, श्री सोनी, चेतन राजपूत आदी यात्रेत सहभागी झाले होते. वाजत गाजत नगरपालिका, निकुंभ साईट्स, टिळक चौक, मंगलमूर्ती पतपेढी मार्गे प्रतापमिल कंपाऊंड मधील हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन भागवत कथा स्थळी समारोप करण्यात आला.
सदर भागवत कथा दिनांक २ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०२३ या काळात प्रतापमिल कंपाऊंड मधील प्रमुख पेट्रोल पंप चे बाजूला असलेल्या जागी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजे दरम्यान होणार आहे. दिनांक २ रोजी कथा सुत -शौनक संवाद, दिनांक ३ रोजी श्री शुकदेव चरित्र, दिनांक ४ रोजी कपिल व्याख्यान -शिव विवाह कथा, दिनांक ५ रोजी प्रल्हाद चरित्र -वामन अवतार, दिनांक ६ रोजी श्रीकृष्ण जन्म, दिनांक ७ रोजी माखन चोरी मटकी फोड, दिनांक ८ रोजी छप्पन भोग, दिनांक ९ रोजी रुक्मिणी मंगल, दिनांक १० रोजी सुदामा चरित्र – शुकदेव विदाई, दिनांक ११ रोजी विष्णू महायज्ञ (हवन) याप्रमाणे कार्यक्रम असणार आहेत. अमळनेर शहरातील भक्तगणांनी कथेचे आयोजन केले असून अमळनेर शहरातील सर्व भक्तगणांनी तन -मन -धनाने सहयोग देऊन भागवत कथेचा लाभ घ्यावा व आपले जीवन सफल करावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.