स्मृतिशेष माजी आमदार गुलाबराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अमळनेरला सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन

अमळनेर : येथील महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ विधानसभा गाजवणारे, समाजवादी विचारांचे खंदे समर्थक मा.आ. साथी गुलाबराव पाटील यांचे दिनांक २२ ऑगष्ट २०२३ रोजी निधन झाले. पूज्य साने गुरुजी विद्यालयाच्या (ना ग गोरे-एस एम जोशी) सभागृहात आज दुपारी ४ वाजता सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अमळनेर परिसरातील विविध संस्थांमध्ये गुलाबराव बापू यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध होता. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिंगाडे मोर्चा काढणारे, अमळनेरच्या क्रांतीचा इतिहास जिवंत ठेवणारे, समाजवादी, सत्यशोधकी व समाज परिवर्तनाचा ध्यास घेणारे बापू आज आपल्यात नाहीत. एक समाजवादी सूर्य, परिवर्तनाचा वाटसरू च्या आठवणींना उजाळा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थिती देणार आहेत.

शोक सभेस उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आम आदमी पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी(CPM), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI), कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर, शेतकरी सहकारी संघ अमळनेर, अमळनेर फ्रूट सेल सोसायटी, खान्देश शिक्षण मंडळ अमळनेर, राष्ट्र सेवा दल, लोक संघर्ष मोर्चा, मंगल ग्रह मंदिर सेवा संस्था अमळनेर, एन. मूक्टो, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना अमळनेर, शिक्षक भारती, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ, साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ अमळनेर, व्यापारी असोसिएशन अमळनेर, बार कौन्सिल ऑफ इंडिया अमळनेर, अमळनेर महिला मंच, आय एम ए, केमिस्ट असोसिएशन, निमा, हिमा, श्रीमती भानुबेन बाबूलाल शाह गो शाळा, राष्ट्रीय किसान मोर्चा, बामसेफ, मौर्य क्रांती संघ, अमळनेर नगर परिषद सफाई कामगार संघटना, युथ सेवा फौंडेशन, आदिवासी पारधी विकास परिषद, प्रहार संघटना, बहुजन रयत परिषद, टी डी एफ (शिक्षक लोकशाही आघाडी), पाडळसे धरण जनआंदोलन समिती, अमळनेर शहर टॅक्सी संघटना, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, व्हॉइस ऑफ मीडिया, हमाल मापाडी संघटना, तालुक्यातील सर्व शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक संघटना व बापूंवर प्रेम करणारे सर्व बंधु भगिनी यांचेतर्फे करण्यात आले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!