मंगळ ग्रह सेवा संस्था भारतीय सेवा रत्न २०२३ पुरस्काराने सन्मानित

अमळनेर : ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन, पुणे तर्फे धार्मिक कार्यासोबत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अमळनेर येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेस भारतीय सेवा रत्न २०२३ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुणे येथील सयाजी हॉटेल येथे २७ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते मंगळग्रह संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, सेवेकरी प्रसाद खालकर, नितीन सोनवणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

संस्थेच्या माध्यमातून जगातील एकमेव मंगळ ग्रह देवतेचे मंदिर विकसित झाले असून या मंदिरात जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. सामान्य जनतेच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने संस्थेमार्फत धार्मिक, सामाजिक, पर्यावरण, आरोग्य, शैक्षणिक आदी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. सोबतच शासकीय योजना जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, शेती विषयक योजनांचा प्रचार व प्रसार करुन संस्थेने वेगळा ठसा उमटवला आहे. या कार्याची ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशनने दखल घेत हा पुरस्कार दिला आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यावेळी ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील बेळगावे व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंगळ ग्रह सेवा संस्थेस आजपर्यंत मिळालेले पुरस्कार…

  • चार आयएसओ मानांकने मिळणारी एकमेव संस्था – २०२१
  • महाराष्ट्र शासन पर्यटन विभागाचा पर्यटन मित्र पुरस्कार – २०२१
  • पाणी फाउंडेशनचा महाराष्ट्रात द्वितीय पुरस्कार – २०१८
  • महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे सन्मान – २०२२
  • गुगल तर्फे पाच पैकी ४.६ रेटिंग देऊन सन्मानित – २०२३
  • भारतीय सेवा रत्न पुरस्कार – २०२३
Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!