खौशी येथे डीजेच्या तालावर पारंपरिक नृत्य, फुगडी खेळत कानबाई मातेला निरोप

घरातील अबाल वृध्दांनी घेतले कानबाई मातेचे दर्शन

अमळनेर : तालुक्यातील खौशी येथे ग्रामदैवत कानबाई मातेचा उत्सव उत्साहात साजरा झाला. सारा गाव एकत्र येऊन एकतेचा संदेश देत पारंपरिक खानदेशी नृत्य, फुगडी खेळत डीजेच्या तालावर वाजत गाजत कानबाई मातेला निरोप देण्यात आला. नोकरी वा व्यवसायासाठी विविध भागात गेलेली कुटुंबे मूळ गावी येऊन या उत्सवात सहभागी झाले होते. कानबाई मातेला शेतकऱ्यांनी पावसासाठी साकडे घातले. अत्यंत पवित्र आणि स्वच्छ वातावरणात सुवासिनींनी कानबाई मातेची स्थापना केली. मातेला विविध अलंकारांनी सजविण्यात आले होते. छोटासा मंडप फुलांनी सजवून तयार करण्यात आला होता. प्रत्येक घरातील अबाल वृध्दांनी मातेचे दर्शन घेतले. सुवासिनींनी कानबाई मातेची ओटी भरली. पहिल्या दिवशी रात्रभर भजन, किर्तनाने जागरण करुन रविवारी स्थापन केलेल्या कानबाई मातेला सोमवारी निरोप देण्यात आला. दरवेळी कानबाई माता सणाला पावसाची हजेरी असते मात्र यावर्षी पावसाने दडी मारल्याने पाऊस पडावा यासाठी कानबाई मातेला भक्तांनी साकडे घातले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!