अमळनेर येथे मराठा समाज बांधवांचा प्रांत कचेरीवर भव्य निषेध मोर्चा; बळीराजा चौकात केले ठिय्या आंदोलन

उपविभागीय अधिकारी यांनी स्विकारले निवेदन; आंदोलकांची भूमिका वरिष्ठ स्तरावर पोहोचविण्याचे दिले आश्वासन

अमळनेर : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे शांततेने आंदोलन करणाऱ्या मराठा समाज बांधवांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज मुळे असंख्य मराठा समाज बांधवांनी प्रांत कचेरीवर भव्य मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. काल दि.६ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० चे सुमारास येथील मराठा मंगल कार्यालयापासून निषेध मोर्चास सुरुवात करण्यात आली. मोर्चाच्या अग्रभागी महिलांनी जाहीर निषेधाचे फलक हातात घेतले होते. काही मराठा बांधवांनी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेले झेंडे हाती घेतले होते. दोषींवर योग्य ती कारवाई करावी व मराठा आरक्षण मागणी मान्य करून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे. बळीराजा चौकात मोर्चा आल्यानंतर एक मराठा.. लाख मराठा’, ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘या सरकारचे चालले काय ? खाली डोकं वर पाय ‘ आदी जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. मोर्चेकऱ्यांनी टरबूज जमिनीवर आपटून लाथा हाणत तीव्र निषेध व्यक्त केला. उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी बळीराजा चौकात येऊन आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. आंदोलकांची भूमिका वरिष्ठ स्तरावर पोहोचविण्याचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चाचे विसर्जन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार बी. एस. पाटील, मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, मराठा महिला मंडळाच्या अध्यक्षा तिलोत्तमा पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, डॉ. अनिल शिंदे, प्रा. अशोक पवार, प्रा. लिलाधर पाटील, न्या. गुलाबराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, सचिव विक्रांत पाटील, कोषाध्यक्ष महेंद्र बोरसे, उपाध्यक्ष संजय पाटील, संभाजी ब्रिगेडचे श्याम पाटील, मराठा सेवा संघाचे कैलास पाटील, संजय पुनाजी पाटील, दर्शना पवार, तुषार बोरसे, गणेश भामरे, मनोज पाटील, विनोद कदम, माधुरी पाटील, प्रा. शिला पाटील, पद्मजा पाटील, प्रा. श्याम पाटील, प्रा. सुरेश पाटील, प्रा. सुभाष पाटील, शिवसेनेचे श्रीकांत पाटील, विजय पाटील, आर. जे. पाटील, भूषण भदाणे, स्वप्निल पाटील, आशिष पाटील, जितेंद्र देशमुख, जे. पी. पाटील, अनंत निकम, बापूराव ठाकरे सचिन वाघ, दिपक काटे, वैशाली शेवाळे, आशा शिंदे, कविता पवार आदी मराठा बांधवांसह विविध समाजातील सुभाष चौधरी, बन्सीलाल भागवत, वसुंधरा लांडगे, प्रविण जैन, प्रदीप अग्रवाल, सुनील शिंपी, सुरज परदेशी, सनी गायकवाड, गोपाळ बडगुजर, चेतन राजपूत आदींनी मोर्चास प्रत्यक्ष उपस्थित राहून मराठा समाजाला पाठिंबा दिला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!