अमळनेर येथे दि. १५ ते १९ ऑक्टोबर दरम्यान शारदीय व्याख्यानमाला रंगणार

मराठी वाड्मय मंडळ आणि प्रा. आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालयाचा उपक्रम

अमळनेर : येथील मराठी वाड्मय मंडळ आणि आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालयातर्फे दि. १५ ते १९ ऑक्टोबर दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दररोज संध्याकाळी ६.३० वाजता शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शारदीय व्याख्यानमालेतून दरवर्षी वैचारिक सुविचारांची मेजवानी मिळत असते. प्रथम दिनी दि. १५ रोजी ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रविंद्र शोभणे (नागपूर) यांच्या विशेष मुलाखतीने प्रथम पुष्प गुंफले जाईल. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्यवाह वि. दा. पिंगळे हे प्रा. डॉ. रविंद्र शोभणे यांची विशेष मुलाखत घेणार आहेत. दि. १६ रोजी बापू हटकर (ठाणे) ‘खान्देश / खान्देशी साहित्यिक व अहिराणी साहित्य’ विषयावर दुसरे पुष्प, दि. १७ रोजी दिपाली केळकर (बदलापूर) ‘शब्दांच्या गावा जावे’ यावर तिसरे पुष्प, दि. १८ रोजी अभिनय दरवडे (धुळे) यांचे ‘सांगा जगायचं तरी कसं..!’ यावर चौथे पुष्प तर समारोपाच्या दिवशी दि. १९ रोजी परिवर्तन संस्था (जळगाव) तर्फे ‘हा कंठ दाटूनी आला’ यावर पाचवे पुष्प गुंफले जाणार आहे.

अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालय येथे दि. २,३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठी वाड्मय मंडळ अमळनेर द्वारा ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. त्या अनुषंगाने शारदीय व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष शामकांत भदाणे, कार्यवाह रमेश पवार, सोमनाथ ब्रम्हे, नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवे, कार्यकारणी सदस्य प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, संदीप घोरपडे, स्नेहा एकतारे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा. श्याम पवार, प्रा. शीला पाटील, स्विकृत सदस्य अजय केले, बजरंगलाल अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापूरे आदींनी व्याख्यानमालेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!