महाप्रसादाचे मानकरी हभप. देविदास पाटील (डी. एम. पाटील सर) व सौ. सुनंदा पाटील
अमळनेर : सालाबादाप्रमाणे तालुक्यातील जानवे येथे दिनांक १५ ते २४ आक्टोबर २०२३ या कालावधीत आई भवानी मातेच्या नवरात्रोत्सव निमित्ताने अखंड हरीनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. वै.प.पू. मोठे बाबांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या किर्तन सप्ताहाचे हे २५ वे वर्ष आहे. सलग १० दिवस सकाळी ५ ते ६ काकड आरती, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ व रात्री ९ ते ११ या वेळेत किर्तन असे कार्यक्रमाचे स्वरुप असणार आहे. गावातील भाईदास देविदास पाटील, अशोक महादू कापडणीस, पितांबर आसाराम पाटील, मच्छिंद्र गणपत पाटील, मगन घनश्याम पाटील, नाटू ढोमण पाटील, रविंद्र भास्कर पाटील, दिपक बबन पाटील, विठ्ठल बाबुराव पाटील, देविदास महादू पाटील किर्तन सेवेकरी आहेत.
रविवार दिनांक १५ रोजी हभप. कैलास महाराज- चोपडा, सोमवार दिनांक १६ रोजी हभप. लक्ष्मण महाराज- तांदळवाडी, मंगळवार दिनांक १७ रोजी हभप. धनराज बाबा महाराज- कोळपिंप्री, बुधवार दिनांक १८ रोजी हभप. गजानन महाराज- वरसाडे, गुरुवार दिनांक १९ रोजी हभप. गोपालजी महाराज- दोनगाव, शुक्रवार दिनांक २० रोजी हभप. मनोज महाराज- ऐनगाव, शनिवार दिनांक २१ रोजी हभप. वैशालीताई (माळी) महाराज- चाळीसगाव, रविवार दिनांक २२ रोजी हभप. राहुलजी महाराज- आळंदी देवाची, सोमवार दिनांक २३ रोजी हभप. दिनेशजी (आण्णा) महाराज- सुरत यांचे रात्री ९ ते ११ वेळेत किर्तन होईल. अखेरच्या दिवशी मंगळवार दिनांक २४ रोजी विजया दशमी ला सकाळी ९ ते ११ हभप. गोविंद महाराज- पाचोरा यांचे काल्याचे किर्तन होईल. त्यानंतर जानवे गावातील सामाजिक कार्यकर्ते हभप. देविदास महादू पाटील (डी. एम. पाटील सर) व सौ. सुनंदा देविदास पाटील महाप्रसाद (भोजन) कार्यक्रमाचे मानकरी आहेत. भाविकांनी किर्तन कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती जानवे येथील समस्त ग्रामस्थ, व्यवस्थापक मंडळ, भजनी मंडळ यांच्या वतीने करण्यात आली आहे.