अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघात विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न

प्रा. म. सी. हळपे निबंधाचे वाचन करतांना.

भुसावळ : येथील अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाच्या साप्ताहिक सभेत सदस्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षपदी रागिणी पुराणिक होत्या. सोबत व्यासपीठावर सचिव अलका ढाके, अर्जून विसपुते उपस्थित होते. रामधून व विश्व प्रार्थनेने कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर गोंदवले महाराजांच्या प्रवचनाचे वाचन झाले. प्रा. डाॅ.जतीन मेढे यांच्या आवाहनात्मक मेसेजचे वाचन रागिणी पुराणिक यांनी केले.

यावेळी सदस्यांनी गोरगरीब व गरजूंना वस्रदान करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करण्यात आला. यात अर्जून तनवाणी, विलास बेंद्रे, समन्वयक मामासाहेब गजानन ठाकूर यांनी चांदणं चांदण हे एकवीरा देवीचे भक्ती गीत सादर करून श्रोत्यांची मनें जिंकली. माजी अध्यक्ष प्रा. डाॅ. म. सी. हळपे यांनी रोटरी क्लब ऑफ भुसावल ने आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त निबंध ‘आठवणीतील गणेशोत्सव’ या आत्मचरित्रात्मक निबंधाचे सदस्यांच्या आग्रहावरून सादरीकरण केले. श्रोत्यांना संघर्षावाचून उत्कर्ष नाहीचे दर्शन घडविले. श्रोत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. प्रा. शुक्ल, शिला उपाध्ये यांनीही यातून सहभाग नोंदविला. अध्यक्षीय भाषणात रागिणी पुराणिक यांनी कलावंतांचे कौतुक केले. ज्ञानदेव इंगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शेवटी कुसुम ताई पाटील यांनी पसायदान म्हटले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!