पाडळसे धरणासाठी भारत जोडो अभियान चे धरणे आंदोलन

विद्यमान खासदारांच्या राजीनाम्याची निवेदनाद्वारे मागणी

अमळनेर : तालुक्यातील पाडळसे धरणासाठी भारत जोडो अभियानाचे प्रा. अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली काल दिनांक ३१ आक्टोबर रोजी प्रांताधिकारी कार्यालय आवारात धरणे आंदोलन करण्यात आले. पाडळसे धरणाच्या बांधकामाला सुमारे सोळा वर्षे झाली परंतु अजून ४० टक्के ही धरण पूर्ण झालेले नाही. १४१ कोटी रुपये किंमत असलेले धरणाचा खर्च आज सुमारे ५ हजार कोटी झाले आहे. हीच किंमत धरण पूर्ण होईपर्यंत सुमारे दहा हजार कोटी पर्यंत जाऊ शकते. धरण पूर्ण व्हायला किती वर्षे लागतील ? याची शास्वती नाही. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी असून साहजिकच जनतेत असंतोष पसरला आहे. शासन, लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे हे अपयश आहे. सुमारे पाच लाख जनतेच्या पाण्याच्या प्रश्नाकडे तत्कालीन व विद्यमान खासदारांनी दुर्लक्ष केले आहे. याचा आम्ही निषेध करतो. विद्यमान खासदारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे प्रांताधिकारी यांचेकडे करण्यात आली आहे.

यावेळी प्रा अशोक पवार यांनी लिहिलेल्या पाडळसे धरणबाबतची पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. जनतेने लोकप्रतिनिधींच्या कामांचे मूल्यमापन केले पाहिजे, धरणाचे काम जलद गतीने पूर्ण झाले पाहिजे, पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला पाहिजे यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. उद्योग व शेतीला पाणी मिळाले तरच खऱ्या अर्थाने विकास होईल. अमळनेर तालुका वर्षांप्रमाणे पाण्यासाठी भटकंती करावी लागते याची जाणीव होण्यासाठी धरणे आंदोलन केले परंतु ही वादळापूर्वीची शांतता आहे असा ईशारा या आंदोलनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर भारत जोडो अभियानाचे प्रा. अशोक पवार, संदीप घोरपडे, संदीप जैन, एस. सी. तेले, उमाकांत ठाकूर, शालिग्राम पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. आंदोलन स्थळी माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार बी. एस. पाटील, नगरसेवक मनोज पाटील, गोकुळ बोरसे तसेच विविध पक्ष संघटना पदाधिकाऱ्यांनी येऊन पाठिंबा दिला.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!