अमळनेरचे कलाकार सतीश कांगणे प्रस्तुत गुरुदेव आर्केस्ट्रामुळे प्रेक्षकांच्या नजरेत भरले

संगीत ऐकल्याने मन प्रसन्न होतेच शिवाय माणसाला मानसिक स्वास्थ्य प्रदान करते

अमळनेर : येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात रविवार दिनांक २९ ऑक्टोबर रोजी सतीश कांगणे प्रस्तुत गुरुदेव आर्केस्ट्रा चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन चिंतामणी शैक्षणिक संकुल चे अध्यक्ष सौ. विद्याताई युवराज पाटील व नानासाहेब युवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सोबत भगिनी मंडळाचे अध्यक्ष सरोजताई भांडारकर, भद्राप्रतिक मॉल चे संचालक प्रतापराव साळी, रायडर सायकलच्या सौ. हिना दुसाने, कृष्णा बॅटरीचे संचालक महेश पाटील, हटके वडापाव चे विजय पाटील किर्तीकुमार कोठारी आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले. यावेळी आयोजकांतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

नादयुक्त गायन, वादन आणि नृत्य यांचा तिहेरी संगम म्हणजे संगीत. सं म्हणजे स्वर, गी म्हणजे गीत, त म्हणजे ताल होय. संगीत ऐकल्याने मन प्रसन्न होतेच शिवाय माणसाला मानसिक स्वास्थ्य प्रदान करते. संगीत कलेतून भावना व्यक्त करता येतात. संगीत आयुष्याला प्रेरणा देते. अमळनेर येथील शिक्षक सतीश कांगणे व त्यांचे सोबतचे सहगायक सुनीता डोंगरे, मनीषा कांगणे, सविता देशमुख, सूत्रसंचालक ग्यानेश वर्मा यांच्या साथीने गाण्यांची मेजवानी देत रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सुनिता डोंगरे यांच्या वाणीतून ‘सत्यम शिवम सुंदरम..’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर जब छाये मेरा जादू.., ए जिंदगी गले लगा ले.., लायी भी न गयी ते निभाई भी गयी.., आइए मेहेरबान.., ए कहा आ गये हम.., शिशा हो या दिल हो.., हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में.., कहदो के तुम हो मेरी वरना.., डफलीवाले डफलई बजा.., एक हसीना थी एक दिवाना था.., ए वक्त ना खो जाए.., देख के तुम को सच बोला है.., आ के तेरी बाहों मे हर शाम लगे सिंदुरी.., आओ ना गले लगा ओ ना.., परबत के उस पार.., चांद मेरा दिल.., आनेवाला पल जानेवाला है आदी गाणी सादर करण्यात आली. रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार उमेश काटे यांनी केले. शिर्षक गीत ‘आ देखे जरा…’ गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वितेसाठी धुळे येथील शेखर साऊंड, स्पर्धा परिक्षा संचालक विजय पवार, साहित्य परिषदेचे शरद पाटील, उमेश काटे, चिमणपुरी पिंपळे आश्रम शाळा व भगिनी मंडळ शाळा चे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, भाऊसाहेब देशमुख, सोपान भवरे यांचे सहकार्य लाभले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!