मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अमळनेर तालुक्यातून साखळी उपोषणाला सर्वपक्षीय पाठिंबा
अमळनेर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्रभर सुरु असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ अमळनेर येथे मंगळवार दि.३१ आक्टोबर पासून तहसील कार्यालय बाहेर साखळी उपोषण सुरु झाले असून प्रांताधिकारी महादेव खेडकर यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला अमळनेर तालुक्यातून सर्वपक्षीय मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. आंदोलनास पाठिंबा म्हणून आंदोलन स्थळी पोस्ट कार्ड आणि स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. येणाऱ्या प्रत्येकाकडून मुख्यमंत्र्यांच्या नावाने पोस्ट कार्ड लिहून घेतले जात आहे. मराठा बांधवांतर्फे पत्रात विनंती करण्यात आली आहे की, इतिहासात पराक्रम गाजवणारा मराठा कायम उपेक्षित असून आता मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे. कायदे आणि इतर अडचणी सोडविणे शासनाच्या हातात आहे. कोणाच्याही दवाखाली बळी न पडता, कोणतीही अडचण न दाखवता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा.. आगामी निवडणुकीत राजकारण्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील व त्याची सुरुवात झाली आहे. तरी मराठ्यांच्या नम्र विनंतीचा सन्मान करावा अशी अपेक्षा पत्रातून करण्यात आली आहे.
नाकर्ते सरकारचे केले प्रतिकात्मक दहन…
रात्री ९.३० चे सुमारास नाकर्ते सरकारचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाला आरक्षण न देणारं नाकर्ते सरकार मेलं रे मेलं.., मराठा समाजावर अन्याय करणारं सरकार मेलं रे मेलं.. अशा बोंबा मारून निषेध व्यक्त करण्यात आला.
माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार बी. एस. पाटील, डॉ. अनिल शिंदे, प्रतिभा शिंदे, ॲड. ललिता पाटील, जयवंतराव पाटील, उमेश पाटील, धनगर पाटील, प्रा. सुभाष पाटील, सुरेश पाटील, सचिन पाटील, घनश्याम पाटील, विजय पाटील, अनंत निकम, सचिन वाघ, प्रवीण देशमुख, ज्ञानेश्वर पाटील, मनोहर पाटील, अरुण देशमुख, विक्रांत पाटील, हर्षल जाधव, जितेंद्र देशमुख, के. डी. पाटील, कल्याण पाटील, राजश्री पाटील, शाम अहिरे, संजय पाटील, भूषण भदाणे, उज्ज्वल मोरे, दर्पण वाघ, शुभम पवार, अधिकराव पाटील, दिनेश पाटील, राजेंद्र देशमुख, दीपक पाटील, सुनील शिंपी, संजय सूर्यवंशी, योगेंद्र देशमुख, शुभम देशमुख, अभिषेक देशमुख, उमेश वाल्हे, दिपक बडगुजर, जयेश पाटील, हर्षल जाधव, हितेश पाटील, प्रसाद पाटील, विजय पाटील, उमाकांत हिरे, उमेश साळुंखे, संतोष बोरसे, दिनेश महाजन, योगेश पाटील, प्रकाश जोगी, जयवंत पाटील, उत्तम देशमुख, अशोक वरकडे यांचे सह अनेक जण सहभागी झाले होते. याशिवाय राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, अमळनेर तालुका बियाणे व किटकनाशक विक्रेते, डी. आर. कन्या शाळा, धुळे जिल्हा भाजपा पदाधिकारी, लोक संघर्ष मोर्चा, पारोळा येथील मराठा समाजाचे तरुण आदींनी उपोषणाला आपला पाठिंबा दिला आहे.