मराठा क्रांती मोर्चा आंदोलनास पाडळसे धरण जनआंदोलन समितीचा पाठिंबा

अमळनेर : येथील मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ येथील प्रांत कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाला पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्या वतीने प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा पत्रक देऊन आंदोलनात सहभाग घेतला. मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांच्या वतीने प्रविण देशमुख, सचिन वाघ, जयवंत पाटील, हर्षल जाधव यांनी पत्रक स्विकारले.

पाठिंबा पत्रकात नमूद केले आहे की, जाती या व्यवसायावर आधारित निर्माण झाल्या आहेत. शेती व्यवसाय करणाऱ्या एका कुणबी बांधवांस इतर मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ मिळत असताना, दुसऱ्या बांधवास केवळ मराठा नोंद असल्याने मूळ पिढी जात व्यवसाय शेतीचा असूनही त्यास आरक्षणापासून वंचित ठेवणे हे अयोग्य आहे. नैसर्गिक न्यायाला धरून शासनाने मराठा बांधवांनाही आरक्षणाचा लाभ देण्यास हरकत नाही. मराठा आरक्षणासाठी लढणारे उमेदवार नेतृत्व म्हणून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सुरु असलेल्या मराठा क्रांती मोर्चा अमळनेरच्या आंदोलनास पाडळसे धरण जनआंदोलन समितीचा जाहीर पाठिंबा आहे असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. मराठा आंदोलकांना पत्र देताना समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, अर्बन बँक संचालक रणजित शिंदे, महेश पाटील, देविदास देसले, रविंद्र पाटील, रामराव पवार, डी.एम.पाटील, पुरुषोत्तम शेटे, सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, महेंद्र जगताप, अर्बन बँक संचालिका वसुंधरा लांडगे, प्रविण संदानशिव, प्रसाद चौधरी, सुशील भोईटे आदिंसह मनोहरनाना पाटील, जे.बी.पाटील, अनंत निकम, सचिन पाटील यांचेसह मराठा आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!