जायन्टस् गृप ऑफ वीरांगना सहेली अमळनेर चा ‘एक पुस्तक एक पणती’ उपक्रम
अमळनेर : पुस्तक भेटीतून विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच मातीच्या पणती भेटीतून गावातील गरजूंना मदत व्हावी हा उदात्त हेतू समोर ठेऊन जायन्टस गृप ऑफ वीरांगना तर्फे जिल्हा परिषद शाळा, पिंगळवाडे च्या विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त अनोखी भेट देण्यात आली. स्वातंत्र्य सेनानी लिलाताई, संत तुकाराम आणि बहिणाई या प्रेरणादायी व्यक्तीमत्त्वांचे संक्षिप्त जीवन चरित्र पुस्तक व मातीची पणती भेट म्हणून देण्यात आल्या.
अमळनेर येथील जायन्टस् गृप ऑफ वीरंगानाच्या अध्यक्षा दिपिका सोनवणे यांनी आपल्या प्रास्ताविकातून मुलांना अवांतर वाचनाचे महत्त्व पटवून ऑनलाइन शॉपिंग न करता तसेच चिनीमातीच्या वस्तू न घेता गावातल्या किंवा शहरातल्या गरजू कुंभाराकडून मातीचेच दिवे खरेदी करा असे आवाहन करत शाळेतील शंभर मुलांना प्रत्येकी एक पुस्तक आणि एक पणती चे वाटप केले. कार्यक्रमास जायन्टस् गृप अमळनेरच्या संस्थापक अध्यक्षा दिपीका सोनवणे, सचिव शोभा पाटील, सदस्या मंगला पाटील, सुदर्शना पाटील, दिपीका चव्हाण, कविता पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना ठेंग, उपशिक्षक दत्तात्रय सोनवणे, प्रवीण पाटील, रवींद्र पाटील, वंदना सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रविण पाटील यांनी केले. रविंद्र पाटील यांनी मुलांकडून “हिंद देश के निवासी…” हे गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.