कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांचा जन्मदिवस वहीतुला करुन साजरा

अमळनेर तालुक्यात मंडळनिहाय दुष्काळ जाहीर करण्याबाबत व विमा देणे बाबत दिवाळीपर्यंत कार्यवाही करण्यात येईल : ना. अनिल पाटील

अमळनेर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांची जन्मदिवसाच्या निमित्ताने वहीतुला करण्यात आली. बाजार समितीचे उपसभापती, संचालक मंडळ, व्यापारी, गुमास्ता हमाल, मापाडी व कर्मचारी वृंद यांच्यावतीने अभिष्टचिंतन समारंभ आयोजित करण्यात आला होता. सदर वह्या गरीब, गरजू विद्यार्थ्याना ज्ञानार्जनासाठी वाटप करण्याच्या उद्देशाने वहीतुला करण्यात आली. यावेळी राज्याचे आपत्ती व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील, मा.आ.कृषीभूषण साहेबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

मा.आ.कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती बाबत उपायोजना करण्याची मागणी नामदार अनिल पाटील यांच्याकडे केली. तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील, संचालक डॉ.अनिल शिंदे, समाधान धनगर, सौ पुष्पलता पाटील,सौ सुषमा देसले, भाईदास भिल, प्रकाश अमृतकार, ऋषभ पारेख आदिनी अवर्षणप्रवण अमळनेर तालुक्यात अनियमित पडलेला पाऊस, पिकांचे झालेले नुकसान या पार्शवभूमीवर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना विमा मंजूर करावा या मागणीचे निवेदन मंत्र्यांना दिले.

यावेळी बोलतांना ना. अनिल पाटील यांनी अमळनेर तालुक्यात मंडळनिहाय दुष्काळ जाहीर करण्याबाबत व विमा देणे बाबत दिवाळीपर्यंत कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. ते म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार शेतकरी हिताचा असून पारदर्शक व उत्तम सुरु असल्याने बाजार समितीत लवकरच कोल्ड स्टोरेज शेतकरी भवन व शेतकऱ्यांना दर्जेदार जेवण देण्याची व्यवस्था करण्याची संचालक मंडळाची मागणी लवकरच पूर्ण करु असे आश्वासन दिले. खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन डॉ.अनिल शिंदे, मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, बाजार समितीचे कर्मचारी गणेश पाटील आदींनी मनोगत व्यक्त करून अशोक पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी मंचावर युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अशोक पवार, पाडळसरे धरण समितीचे सुभाष चौधरी, खा.शि. मंडळ संचालक हरी वाणी, पं.स.चे मा.सभापती श्याम अहिरे, प्रा.सुरेश पाटील, एल.टी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

सत्कारास उत्तर देताना अशोक पाटील म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी हिताचे जास्तीत जास्त काम करण्यासाठी प्राधान्य असून ना.अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीत कोल्ड स्टोरेज, शेतकरी निवास भवन व शेतकऱ्यांसाठी दर्जेदार जेवण या मूलभूत सुविधा तातडीने निर्माण करण्यासाठी आग्रही असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्बन बँक संचालक रणजित शिंदे यांनी केले. कृ.उ.बा संचालक प्रा.सुभाष पाटील, नगरसेवक संजय पाटील, प्रताप शिंपी, महेश पाटील, गटविकास सचिव संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, योगेश महाजन, पंकज वाणी, रा.कां.महिला अध्यक्षा मंदाकिनी भामरे, बाळू पाटील, सुनिल शिंपी, शब्बिर पहेलवान, ढेकू चेअरमन निळकंठ पाटील, सदाबापू पाटील, प्रफुल पाटील, अंबु पाटील आदींसह कृ उ बा संचालक प्रफुल पाटील, हिरालाल पाटील, समाधान शेलार, मुख्याध्यापक चंद्रशेखर व्यास, आशिष पवार, प्रशांत मराठे, समाधान शिंदे यांनीही कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थिती देत शुभेच्छा दिल्यात. तर साई गजानन मंडळ, पाडळसरे धरण जन आंदोलन समिती, व्यापारी असोसिएशन, गुमास्ता व हमाल मापाडी संघटना, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उमेश राठोड व कर्मचारी वृंद, अमळनेर शहर व तालुक्यातील पत्रकार बांधव , लोण ग्रुप ग्रामस्थ व युवक मंडळ, सरस्वती विद्या मंदिर, सौ विमलबाई आधार पाटील प्राथमिक विद्या मंदिर, स्व. दे. ना. पाटील माध्यमिक विद्यालय, चौबारी, स्व. स्मिता पाटील शिक्षण संस्था संचलित सौ. पदमकोर जमादार माध्य. आश्रमशाळा, कै. दि. पाडवी प्राथमिक आश्रम शाळा जळोद शिरपूर, माध्यमिक विद्यालय विसरवाडी, नवापूर, यांच्या शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी अशोक पाटील यांचा सामूहिक सत्कार केला.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!