बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे अमळनेेर येथे बलिप्रतिपदेला महात्मा बळीराजा गौरव मिरवणूक संपन्न

अमळनेर : येथील जय अंबे मित्र मंडळ व तरुण कुढापा मित्र मंडळ यांच्या पुढाकाराने तसेच पुरोगामी विचाराच्या विविध संघटनांच्या मार्गदर्शनाने बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे बलिप्रतिपदेला महात्मा बळीराजा गौरव मिरवणूक पार पडली. ‘ईडा पिडा टळो.. बळीचं राज्य येवो’ चा जयघोष करण्यात आला. पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते शिरुड नाका येथून महात्मा बळीराजा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले. सजविलेल्या बैलगाडी वर शेतकरी तसेच बळीराजाच्या पेहरावात अजिंक्य श्याम पाटील याने वेशभूषा केलेली होती. यावेळी बाजार समिती सभापती अशोक पाटील, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष श्याम पाटील, माजी नगरसेवक विक्रांत पाटील, बाळासाहेब कदम, राजेश पाटील, शरद पाटील, प्रा. डॉ. लिलाधर पाटील, दिलीप पाटील, मधुकर पाटील, शिवा पाटील, संजय पाटील, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रामेश्वर भदाणे आदी मान्यवर उपस्थित होते. अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे यांनी सूत्रसंचलन केले. सौ.वसुंधरा लांडगे यांनी जिजाऊ वंदना म्हटली. मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी शेतकरी गीते सादर केलीत. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे बाजार समितीच्या प्रवेशद्वाराला बळीराजा प्रवेशद्वार नामकरण केल्याबद्दल सभापती अशोक पाटील, संचालक सुभाष पाटील, गटसचिव संघटनेचे विजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बैलगाडी चालक शेतकरी तसेच बळीराजाचा पेहराव करून सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या अजिंक्य श्याम पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.

एक तपाहून जास्त कालावधीपासून परंपरागत महात्मा बळीराजा गौरव मिरवणूक सुरु आहे. मिरवणूक शिरूड नाका परिसर, बडगुजर मंगल कार्यालय, वड चौक, त्रिकोणी बगीचा, बस स्थानक मार्गे, धुळे रोड विश्राम गृह मार्गे बळीराजा स्मारका जवळ आणून महात्मा बळीराजा चे पूजन करुन समारोप करण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ नेते मनोहर पाटील, डॉ.कुणाल पवार, डी.डी. पाटील, सयाजीराव पाटील, इंजि. प्रशांत निकम, श्रीकांत चिखलोदकर, जयवंतराव पाटील, महेश पाटील, प्रा. प्रदीप पवार, एस.एम.पाटील, राजेंद्र पाटील, नरेंद्र अहिरराव, संजय कुंभार, विजय पाटील, नरेंद्र पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या वसुंधरा लांडगे, वैशाली शेवाळे, आरती पाटील, प्रतिभा पाटील, शैलजा शिंदे यांचेसह अशोक पाटील, प्रेमराज पवार, डी.ए. पाटील, प्रा. स्वप्निल पवार, अजिंक्य चिखलोदकर आदी उपस्थित होते. मिरवणुक यशस्वीतेसाठी मधू पाटील, गुलाब पाटील, दत्तू पाटील, दिलीप कोळी, उमेश शेटे, कुंदन पाटील, विकास पाटील, वाल्हे सर, बापू मिस्त्री, प्रदिप पाटील, नवल पाटील, संजय पाटकरी, भटू पाटील, रवी पाटील, अमोल पाटील आदींसह युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!