
अमळनेर : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना दोन तरुणांनी संसदेत प्रवेश करून स्मोक हल्ला केला. या घटनेबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत सविस्तर निवेदन केंद्रीय गृहमंत्री यांनी संसदेत करावे या मागणी करणाऱ्या दोन्ही सभागृहातील एकूण १४२ खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले. ही एकप्रकारे लोकशाही तत्वाची नग्न हत्या आहे. याबाबत तालुक्यातील इंडिया आघाडीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेतर्फे सविस्तर निवेदन आज प्रांताधिकारी यांना देण्यात आले. लोकशाही तत्वाच्या या अपमाना विरोधात इंडिया आघाडी तर्फे विरोध व निषेध करुन भाजप सरकारचा धिक्कार करण्यात आला.
‘लोकशाही’ शेवटची घटीका मोजत आहे असे केंद्र सरकारच्या धोरणावरुन लक्षात येत आहे. येत्या काळात जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. तसेच निलंबन केलेल्या खासदारांचे निलंबन हे तात्काळ मागे घेण्यात यावे, निलंबन मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. यावेळी ज्येष्ठ नेते डॉ. बी. एस. पाटील, ज्येष्ठ नेत्या तिलोत्तमाताई पाटील, सुलोचना वाघ, भारती पाटील, गोकुळ बोरसे, बी. के. सूर्यवंशी, डी. एम. पाटील, तौसिफ तेली, अब्दुल रज्जाक शेख, विवेक पाटील, तुषार संदानशिव, हर्षल जाधव, रोहिदास पाटील, प्रताप पाटील, उमेश पाटील, सचिन वाघ, रामकृष्ण पाटील, कन्हैयालाल पाटील, भिवसन पाटील, अरुण शिंदे, विजय पाटील, बाळासाहेब पाटील, विलासराव पवार तसेच तालुक्यातील इंडिया आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.