साने गुरुजी जयंती निमित्त साने गुरुजी वाचनालयात अभिवादन

अमळनेर : पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात पूज्य साने गुरुजी जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे होते. स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थिनी संपदा पाटील हिच्या हस्ते सानेगुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

स्पर्धा परीक्षेचे संचालक विजयसिंग पवार पूज्य साने गुरुजी यांच्या कार्यावर प्रकाश टाकतांना म्हणाले की, साने गुरुजींनी १९२८ साली ‘विद्यार्थी’ नावाचे मासिक सुरु केले. त्यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा फार प्रभाव होता. स्वतःच्या जीवनात देखील ते खादी वस्त्रांचाच वापर करीत असत. समाजातील जातीभेदाला, अस्पृश्यतेला, अनिष्ट रूढी परंपरांना साने गुरुजींनी कायम विरोध केला. गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या साने गुरुजींनी १९३० साली शिक्षकाची नौकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत उडी घेतली. पुढे १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून सानेगुरुजीनी स्वातंत्र्याचा प्रचार केला. स्वातंत्र्य समरातील त्यांच्या सहभागामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. नाशिकला कारागृहात त्यांनी ‘श्यामची आई’ चे लेखन पूर्ण केले. धुळे येथे कारागृहात असतांना साने गुरुजींनी विनोबा भावे यांनी सांगितलेली ‘गीताई’ लिहिली. त्यांचे कार्य भावी पिढीला प्रेरणादायी असल्याचे सांगितले. याप्रसंगी साने गुरुजी वाचनालयाचे जेष्ठ संचालक भिमराव जाधव, सहचिटणीस सुमित धाडकर, ईश्वर महाजन व स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी कोमल पाटील, कोमल भोई, किरण लांबोळे ,जलमित्र मयूर देसले, बाबाजी पाटील, आदित्य पाटील व सानेगुरुजी ग्रंथालय व वाचनालयाचे कर्मचारी रमेश सोनार, मधुकर बाळापुरे आदी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!